नान्नज दुमाला येथील ज्ञानेश्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
संगमनेर । झुंजार न्यूज
तळेगाव निमोण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जलसंपदा विभागाच्या अधिकार्याच्या समवेत बैठका झाल्या आहेत.त्यामुळे या दुष्काळी भागा साठी भोजापुरचे पाणी येण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही.तुम्ही अजिबात चिंता करू नका या भागातील भोजापुर पूरचारीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून पाच वर्षाच्या आत या दुष्काळी भागाला पाणी देऊन हा भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला

संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र नान्नज दुमाला येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात तील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महामंडलेश्वर डॉ रामकृष्णदास महाराज लवितकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली याप्रसंगी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष भीमराज चत्तर ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक गुंजाळ भोजापूर पाठचारी लढ्याचे प्रमुख किसन चत्तर संपत फड यांच्यासह भावी फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

आ खताळ म्हणाले माजी मंत्री स्व बी जे खताळ यांच्या माध्यमातून या तळेगाव निमोण दुष्काळी पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला मात्र दुर्दैवाने चाळीस वर्षात या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असता परंतु तो मार्गी लागला नाही या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आ अमोल खताळ यांच्या माध्यमा तूनच सुटेल अशी परमेश्वराची इच्छा अस ल्याचे सांगत ते म्हणाले की निवडणूक प्रचार दरम्यान. साकुर आणि तळेगाव निमोन या भागातील जनतेला तुमचा पाण्याचा प्रश्न मी सोडवेल असा शब्द दिला होता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा साकुर आणि तळेगाव निमोण या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न आपण उपस्थित केला होता. राज्या च्या जलसंपदा मंत्रीपदी राधाकृष्ण विखे पा यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम तळेगाव निमोण भागातील प्रलंबित अस लेल्या भोजापुर पूरचारीच्या दुरुस्ती च्या संदर्भात जलसंपदा विभागातील अधिकार्याच्या समवेत बैठक घेतली आहे त्यातील काही अधिकार्यांनी माझ्याशी संपर्ककेला आहे आत्तापर्यंत आमच्या २ पिढ्या गेल्या तरीसुद्धा पाणी आले नाही परंतु आता अजिबात काळजी करू नका तुमची ही पिढी जाऊ देणार नाही यासाठी योगा योगाने जलसंपदा मंत्रीपद ही राधा कृष्ण विखे पाटील यांच्याकडे आले आहे त्यामुळे थोड्या दिवसातच या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे
.

ज्याला त्याला प्रत्येकाला त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तसा मला सुद्धा माझ्या धर्माचा अभिमान आहे धर्माच्या कार्या बरोबर येथून मागेही होतो आणि इथून पुढे राहणार आहे आपण कधीच कुठ ल्याही धर्माला कमी लेखनार नाही परंतु माझ्या धर्माचा आणि वारकरीसंप्रदायाचा मला सार्थ अभिमान आहे
आमदार अमोल खताळ
आम्हाला कायम उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची सवय आहे असे महा मंडलेश्वर डॉ रामकृष्णदास महाराज लह वितकर यांनी म्हटले त्यावरती आमदार अमोल खताळ म्हणाले की सूर्य कायम उगवतच राहणार आहे जोपर्यंत या माय बाप जनतेची इच्छा आहे तोपर्यंत उगवता सूर्य हा प्रखर तेजाने उगवतच राहील अशी मुश्किल टिप्पणी आमदार खताळ यांनी केल्यानंतर सप्ताह स्थळी एकच टाळ्यांचा गजर होत एकच हशा पिकला
राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे तळेगाव निमोण परिसरातील भोजापुर चारीला बारा महिन्याच्या आत पाणी आले पाहिजे आणि हा सर्व परिसर हिरवा झाला पाहिजे तसेच या गावातील खंडोबा मंदिरासाठी तुमच्या आमदार निधीतील पहिला निधी दिला पाहिजे अशी मागणी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आणि भाजपचे जेष्ठ नेते माजी सरपंच भीमराज चत्तर यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली त्यांनी त्यांच्या मागणीचा तात्काळ विचार करून माझ्या पहिल्या आमदार निधीतील दहा लाख रुपये या खंडोबा मंदिराच्या विकास कामांसाठी देत अस ल्याचे जाहीर करताच सर्व नान्नजकरांनी टाळ्यांचा एकच गजर केला

