संगमनेर । झुंजार न्यूज

थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वा होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधनजवळील मैदानावर सुरू असून या तयारीची पाहणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालयाजवळील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते.

यावर्षी १२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाह महाराज व मा. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत व काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबेमुजफ्फर हुसेन यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *