आश्वी । झुंजार न्यूज
येथील पिप्रीलौकी अजमपुर तसेच आश्वी खुर्द येथील आराध्य दैवत श्री क्षेत्र मोठे बाबा गडावर जाणारा रस्ता मुरमीकरन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तसेच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण करण्यात आल्याची माहिती श्री क्षेत्र मोठे बाबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रा. कान्हू गिते यांनी सांगितले.
अनेक दिवसापासुन गावठाण ते श्री क्षेत्र मोठे बाबा रस्त्याचे काम रखडले होते. नुकताच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्री क्षेत्र मोठे बाबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक कान्हू गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थाचे शिष्ठमंडळ भेटले होते. याची दखल घेत सदर रस्त्याची मागणी तात्काळ मान्यता देत युध्द पातळीवर काम सुरू करण्यात आले. यावेळी आश्वी खुर्द तसेच पिप्रीलौकीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
