आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

मोठेबाबा यांचे मूळ ठाण हे अंकाई किल्ल्यावर असून गुरख्यां बरोबर देव खांबे या ठिकाणी आलेले आहे असे बोलते जाते श्री मोठे बाबा हे गावाकऱ्या प्रमाणे आमचे ही आराध्य दैवत आहे. जेव्हा ही वेळ मिळतो तेव्हा खताळ परीवार येथे दर्शनासाठी येत असल्याचे नीलमताई खताळ यांनी सांगितले.

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील खांबे गावचे ग्रामदैवत श्री मोठेबाबा यात्रोत्सव निमित्त आमदार अमोल खताळ यांच्या सौभाग्यवती नीलमताई खताळ यानी नुकताच गावाला भेट देत मंदिरात जाऊन दर्शन घेतले.यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने नीलमताई खताळ यांचा सत्कार करण्यात आला. यात्रे निमित्याने दोस्ती साम्राज्य ग्रुपने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नीलमताई खताळ यांनी दोस्ती साम्राज्य ग्रुप चे अभिनंदन करून शुभेच्या दिल्या. तसेच नीलमताई खताळ यांनी यावेळी यात्रेतील दुकानदारांची भेट घेऊन विचारपूस केली.

 

 

 

 

 

यावेळी सरंपच रविंद्र दातीर यांनी श्री क्षेत्र मोठेबाबा देवस्थान क वर्गात करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली. त्यावर येणाऱ्या काळामध्ये श्री मोठेबाबा देवस्थान खांबे यांची अमदार अमोल खताळ नक्कीच प्रयत्न करतील असे आश्वासन नीलमताई खताळ यांनी दिला. यावेळी सरपंच रवींद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, सदस्य मीनाताई भांगे, मनीषा दातीर, रोहिणी कापडी, शितल कापडी, अनिता दातीर ,युवा नेतृत्व अजय दातीर, डॉ भास्कर दातीर , अमोल पोंदे, वैभव शिंदे, रतन दातीर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *