{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सामाजिक व  आंबेडकरी चळवळीचे आक्रमक कार्यकर्ते तथा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय खरात यांना माजी आमदार पी जे रोहोम फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामसंसद पुरस्कार २०२५ चा पुरस्कार देण्यात आला .

 

संजय खरात हे मालुंजे गावचे रहिवाशी असून गावांच्या विकासाकरिता सातत्याने आग्रही राहून सामाजिक कार्यात पुढाकार घेवून युवक संघटन करण्याचे मोलाचे सहयोग राहत असून कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक , धार्मिक , कार्यातून मनोभावे लोकांची नि:स्वार्थीपणे काम मार्गी लावणे , तसेचं शालेय विदयार्थ्यांना शासकिय उपयोगाकरिता विविध प्रकारेचे दाखले अथवा कागदपत्रे काढून देणे त्यांच्या सामाजिक वृत्तीमुळे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली . 


   

त्यांच्या कार्याची दखल घेत रोहोम पुरस्कार समितीने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली .  या निवडीबद्दल . या पुरस्काराने त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे . माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात, रिपाइंचे जेष्ठ नेते सुधाकरराव रोहोम,  रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, मुख्य संयोजक ऍड किरण रोहोम, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे आदींनी शाल , पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .

पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात , आमदार सत्यजीत तांबे , जयश्रीताई थोरात , संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख , कृउबास चेअरमन शंकरराव खेमनर , गणपतराव सांगळे , दूध संघाचे व्हाचेअरमन राजेंद्र चकोर , . दूध संघाचे संचालक विक्रम थोरात , बबनराव कराड , संतोष नागरे , पत्रकार राजेश गायकवाड आदीसह सोशल मिडीया द्रारे अनेकांनी शुभेंच्छा दिला .
 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *