अकोले । झुंजार न्यूज
अकोले तालुक्यातील वाशेरे गावचे सुपुत्र व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते रमेश शिरकांडे यांना माजी आमदार पी जे रोहोम फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामसंसद पुरस्कार २०२५ चा पुरस्कार मिळाला .
रमेश शिरकांडे यांनी वाशेरे गावच्या विकासात खुप मोलाचे योगदान दिलेले आहे त्यात प्रामुख्याने.गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, चेअरमन , मार्केट कमेटी संचालक, व विद्यमान तंटामुक्तीचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषवत गावांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय धोरण आखल्यानेचं त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार समितीने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली .
या पुरस्कार निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे . माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात, रिपाइंचे जेष्ठ नेते सुधाकरराव रोहोम, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, मुख्य संयोजक ऍड किरण रोहोम, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे, जिल्हा सरचिटणीस मा. तुकाराम जाधव सर आदींनी शाल , पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
सोशल मीडियातून ही माहिती मिळताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे, अकोले तालुका युवक अध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नेते चंद्रकांत सरोदे, उद्योजक कल्पित वाकचौरे, सार्वभौम न्युज चॅनल , पोर्टल चे संपादक सागर शिंदे, वाशेरे गावचे सरपंच किरण गजे, उपसरपंच मनीषा वाकचौरे, पोलीस पाटील सतिष वाकचौरे, माजी सरपंच राजू गजे, गवराम गजे, माजी उपसरपंच अनिल वाकचौरे, शिवसेना नेते सुरेश भिसे, माजी सरपंच बबन भिसे, तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष नितीन वाकचौरे , माजी उपसरपंच स्वाती शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद वाकचौरे, पोपट गजे , रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष मा. गोरख शिरकांडे,मा. विष्णू हरनामे, प्रकाश देठे, मारुती सोनवणे पेंटर, गौतम देठे, कवी- अशोकराव शिंदे, भाऊसाहेब निळे सर, दिनकर बर्वे सर, गौतम साळवे पेंटर, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, संतोष देठे, पत्रकार प्रविण देठे, सचिन खरात आदींनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .!

