कसारे । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कसारे येथील जि. प. प्रा. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांकडून जाणीवपूर्वक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत रद्द करण्यात आले व कारवाईच्या भीतीने समारोपाच्या शेवटी गीत घेण्यात आले.
.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यातील कसारे येथील जि. प. प्रा. शाळेच्या गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु शाळेतील एका शिक्षकाच्या आडमुठेपणामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील गीत जाणीवपूर्वक रद्द करण्यात आले होते. परंतु तेथील जागरूक नागरिकांची कुजबुज सुरु होताच व आपल्यावर कारवाई होण्याच्या भीतीने शिक्षकाने प्रसंगावधान साधत कार्यक्रमाची सांगता होते समयी गीत घेण्यात आले.
शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी माजी. आमदार पी. जे रोहम फौंडेशन चे अध्यक्ष ऍड. पी. जे. रोहम, सोमनाथ गायकवाड उप सरपंच ग्रामपंचायत वडगाव पान, आत्माराम जगताप मा. सं. कृ. ऊ. बा. समिती संगमनेर, अमोल जगताप संगमनेर युवक अध्यक्ष आर. पी. आय. पत्रकार रामनाथ बोऱ्हाडे, पत्रकार सोनावणे, रुपवते सर, विनोद गायकवाड आदींनी
याबाबतचे निवेदन मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांना देण्यात आले.
या निवेदनात संबंधित शिक्षकांची चौकशी करून निलंबित करण्या यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
