आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील झरेश्वर मंदिरांच्या प्रागंणात पंचायत समिती संगमनेर व एकात्मिक बालविकास प्रकल्प घारगाव-1 यांच्या संयुक्त विद्यामानाने राष्ट्रीय पोषण अभियान 2025 “आरंभ धमाल मजा मस्ती बालक पालक मेळावा” मोठया उत्साहात संप्रन्न झाला .

0 ते 6 वयोगटातील लहान बालकाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी हा”धमाल मजा मस्ती” मेळावा आयोजित करण्यात आला होता,
या मेळाव्यात बालक आणि पालकांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम जसे की रांगोळी, पाण्याचे खेळ, भविष्याचे झाड, तुम्ही तुमच्या बालकासोबत बोलतात का?, सेल्फी पॉईंट, तोंडात घास, बाळाला हसून दाखवा, बुद्धी आलेख, बाहूली घर, मेंदूचे जाळे , रांगोळी , घरगुती वादय वाजविणे , आहार बोगदा असे 40 प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात आले .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संगमनेर पचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे , सौ रोहीनी नागणे , माजी प्रकल्प अधिकारी श्रीमती कुकडे , मुख्यसेविका श्रीमती अंधुरे , झरेकाठी संरपच अशोकराव वाणी , सामाजिक कार्यकर्ते भारतराव गीते झरेश्वर मंदिराचे प्रमुख नागभूषण महाराज , ग्रामसेविका श्रीमती शिंदे , ग्रामसेविका श्रीमती कल्पना काळे आदीसह अंगणवाडी सेविका , मदतनिस , आशा सेविका , महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित राहून प्रत्येक उपक्रम समजून घेत स्वतः बालकांसमवेत उपक्रमात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला .

