पानोडी । झुंजार न्यूज

 

 

असं म्हणतात की, देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वाच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे सुध्दा कठीण असते म्हणूनचं आई म्हणजे देवाचं दुसरं रूप मानले जात असून संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील श्रीमती शांताबाई सोपानराव घुगे यांचे अचानक चालता – बोलता हदयविकाराने दुःखद निधन झाले ही मनाला हूरहूर लागणारी दुःखद बातमी होती . मात्र देवा पुढे कोणाचे काही चालेना नुसार ” जो आवडे सर्वांना , तोचि आवडे देवाला म्हणीनुसार शांताबाई सोपानराव घुगे यांनी वयाच्या ६६ वर्षी जगाचा निरोप घेतला . 

स्व शांताबाई घुगे ह्या अतिशय मनमिळाऊ , धार्मिक वृत्तीच्या होत्या . सामाजिक , राजकिय व धार्मिक क्षेत्रात त्याना सातत्याने काम करण्याचा इच्छा असे सातत्याने होणाऱ्या गावांतील धार्मिक कार्यात त्या सहभागी असत पती सोपानराव घुगे यांनी उभे केलेल्या दत्त मंदिराची देखभाल करत भक्ती भावने भक्ती रस चालू ठेवला . संपूर्ण गावात शांताबाई या नावाने परिचित असणाऱ्या लहानग्या पासून ते मोठया पर्यत सर्वांच्या त्या मावशी होत्या .

शिबलापूर म्हणजेचं पानोडी शिबलापूर सिमेवरील त्या नागरे परिवारातील होत्या . तर शेजारीचं पानोडी येथील त्यांचे सासर होते . दोन्ही गावामध्ये नातलगाचा मोठा गोतावळा असल्याने त्यांची सर्वावर एक प्रेमळ दहशत होती . कुठल्याही प्रकारे त्यांच्या वैचारिक सल्ला घेतला जात असे . सर्वांच्या दुःखा – सुखात त्या सातत्याने उभ्या रहात असे . आपल्या संसाराचा गाडा रुळावर आला असताना पती  सोपानराव यांनी साथ सोडली मात्र न डगमगता सर्व संकटांना धैर्याने घेत मुला मुलीवर चांगले संस्कार घडविले . रामभाऊ या मुलाला व्यावसायिक बनविले तर दोन मुलांना शासकिय नोकरीत जाण्याची दिशा दाखविली .संगमनेर पचायत समिती विस्तार अधिकारी भारत घुगे , रेल्वे पोलिस श्यामराव घुगे , व्यावसायिक रामराव घुगे यांची आई व सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब , भाऊसाहेब  यांच्या त्या भावजयी होत्या .

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या प्रथम जनसेवा विकास मंडळाच्या संरपच झाल्या . संरपच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासाला चालना दिली . त्यांच्या प्रेमळ व रोख ठोक स्वभावामुळे त्या परिचित होत्या त्याच्या निधनाची वार्ता समजताचं जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांच्या घरी येवून मुलासह नातलगाची भेट घेतली .

 

आज शुक्रवार दि १४ फेबूवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पानोडी येथे त्याच्या दशक्रिया विधी होत असून त्यांना झुंजार न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली ! 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *