वनपाल सुहास उपासनी यांना सेवापुर्ती निमित्त खताळ यांनी दिला सल्ला

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

 

वनविभागात वनमजूर ते वनपाल अशी ३६ वर्ष अत्यंत प्रामाणिक व निष्कलंक सेवा केली .आता तुम्ही सेवानिवृत्त झाले आहे.त्यामुळे येथून पुढील आपले उर्वरित आयुष्य संगमनेरातील सामाजिक कार्या साठी द्यावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी सेवापूर्ती गौरव समारंभात सुहास उपासनी यांना दिला

 

 

 

 

संगमनेर वनविभागात वनपाल म्हणून सेवानिवृत्त झालेले सुहास उपासनीआणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सुषमा उपासनी यांचा सेवापुर्ती निमित्त आअमोल खताळ व त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला.त्यावेळीआयोजित कार्यक्रमात बोलताना आ खताळ म्हणाले की सुहास उपासनी यांनी वनविभागात काम करत असताना ते आपल्याकामाशी प्रामाणिक राहत कायम एकनिष्ठ राहिले. आणि त्यातून त्यांनी प्रत्येकाशी प्रेमआणि स्नेह वाढवीला.त्यामुळेच त्यांच्या सेवपूर्ती च्या कार्यक्रमास एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला ही त्यांच्या कामाची पावती असल्याचे गौरवोद्गार आमदार खताळ यांनी काढले.

 

 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक योगेश उपासनी यांनी केले. सूत्रसंचालन सायली जोशी यांनी केले .तर आभार अजिंक्य उपासनी यांनी मानले .

 

 

यावेळी यावेळी विनायक उपासनी, अनिल बिवरे ,निखिल बिवरे योगेश उपासनी,अविनाश उपासनी ,निलेश, उपासनी स्वप्नील उपासनी रविंद्र उपासनी ऍड अजिंक्य उपासनी डॉ वर्षा उपासनी प्रवीण मुळे,निलेश देशपांडे, निरंजन भालेराव ॲड.अजिंक्य उपासनी,सून-डॉ.वर्षा उपासनी , प स माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे , जेहूरभाई शेख , दिलीप नागरे , प्रशांत कांबळे , पत्रकार राजेश गायकवाड , बाळू नागरे  आदी उपस्थित होते .

 

 

 

 

 

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक सुभाष इथापे,शिवाजी फटांगरे,एस एस संगमनेरचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील पनवेल चे सहाय्यक वनसंरक्षक सागर माळी ,,सिन्नर वनपरिक्षेत्राधिकारी हर्षल पारेकर संगमनेर वनविभागाचे वन परिक्षेत्राधिकारी सागर केदार, सचिन लोंढे,सुभाष सांगळे प्रा अनिल बिवरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

 

 

संगमनेर मधील काही साप आम्ही ठेचले भविष्यात उर्वरितही ठेचू-“आ खताळ

 

ज्याप्रमाणे वनविभागाच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काम करताना सुहास उपासनी यांनी साप पकडण्याची कला आत्मसात केली .संगमनेरा सुद्धा अनेक साप तयार झालेत यातील काही साप आणि बिबटे आम्ही ठेचले आहे जे राहिले आहे तेही भविष्यामध्ये वनसफारीच्या माध्यमातुन ठेचून काढू असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *