आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील इरीगेशन रोड वरील गणपती मंदीरासमोर मोटर सायकलच्या समोरा समोर अपघातामध्ये नितीन हिवाळे वय ४२ वर्षे हा जागीच ठार झाला असुन जख्मी विट भट्टी कामगार विशाल बर्डे ह्याला पुढील उपचारासाठी लोणी (ता राहाता) येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

सविस्तर माहीती अशी की, गाडी नंबर एम एच १७ डि बी ७२६५ गाडी चालक नतिन हिवाळे वय ४२ वर्षे राहणार आश्वी बुद्रुक (ता संगमनेर) हा लोणीवरून कामावरून आपल्या घरी येत होता तर गाडी नंबर एम एच १६ सी डब्ल्यु ७८५१ विट भट्टी काम गार विशाल बर्डे (वय १९) राहणार प्रतापपुर (ता संगमनेर) हा आश्वी बुद्रुक हुन प्रतापपुर (ता संगमनेर) येथे जात होता इरीगेशन रोड वर गणपती मंदीरासमोर दोन्ही गाड्याची मोठी धडक झाली, घटनास्थळी नुकसान बघता गाडी स्वार हा वेगात असल्याचे दिसते.

गणपती मंदिरा समोर ४० वर्षापुर्वी मोठा अपघात झाला होता. त्या अपघाता मयताच्या डोक्याला जबर मार लागतला होता मयत हा उस वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर मधून उस काढताना खालीपडुन त्याच्या डोक्यावरून उस वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरचे चाक गेल्याने तो जागीच मृत्यु झाला होता या घटनेचा उजाळा आज या अपघातामुळे झाला.

आश्वी बुद्रुक (ता संगमनेर) येथील लोणी हसनापुर रस्ता हा वर्दळीचा असुन येथे अनेकदा अपघात होत असतात येथे कामय स्वरूपी पोलीस उभे राहणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी मागणी केली. याघटनेत मृत नितीन हिवाळे हे पेपर वाटणारा सचिन अमोलिक यांचे दाजी होते.
Post Views: 1,305

