हिवरगाव पावसाला मंत्री राधाकृष्ण विखे पा आणि आमदार अमोल खताळ यांचा नागरी सत्कार
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी आ.अमोल खताळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सरकारच्या वतीने सर्व पाठबळ उभे केले जाईल असा विश्वास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक असलेलेल्या या मनुष्यबळच्या प्रशिक्षणासाठी संगमनेर येथे लवकरात लवकर कौशल्यविकास केंद्र सुरूकरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा ग्रामस्थ आणि महायुतीच्या वतीने राज्याच्या जलसंपदा मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना.राधाकृष्ण विखे पाटील व संगमनेर तालुक्यात परिवर्तन करून भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल आ. अमोल खताळ यांचा नागरी सत्कार आयोध्या येथील श्री.श्री १००८श्री.जद्गुरू परमहंस आचार्य आणि महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री विखे बोलत होते या वेळी व्यासपीठावर रिपाईचे कैलास कासार , भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे , भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, ओजस्वी भारत फौंडे शनचे अध्यक्ष विनोद गायकवाड, शिव सेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजप ज्येष्ठ नेते सुदाम सानप, संतोष रोहम, अशोक कानवडे भाजप माजी तालुका ध्यक्ष काशिनाथ पावसे, उपाध्यक्ष गणेश दवंगे देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे अल्पसंख्यांकचे जिल्हा प्रमुख सोमनाथ भालेराव भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्रीराज डेरे शरद गोर्डे, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे कविता पाटील, रऊफ शेख केशव दवंगे बाळा साहेब शेटे गणेश पावसे यांच्यासह आधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारासाठी तीन औद्योगिक वसाहतींना जागा उपलब्ध करून दिली आहे. संगमनेरला औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असून, या संदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सुतोवाच करून औद्योगिक वसाहती करीता आवश्यक असलेल्या मनुष्यबळच्या प्रशिक्षणासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र तातडीने संगमनेर मध्ये सुरू करणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.
अनेक वर्षे या तालुक्यातील युवकांनी अन्याय सहन केला. त्यांना तालुक्यामध्ये परीवर्तन हवे होते. तालुक्यातील जनतेन मोठ्या विश्वासाने परीवर्तन घडवले आहे. राज्यात सर्वात मोठा विजय आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळाला आहे.आ. खताळ यांच्या विजया मध्ये लाडक्या बहीणींचा फार वाटा मोठा असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या. निवडणुकीत दिलेली आश्वासन महायुती सरकार निश्चित पूर्ण करेल.ही लाडकी बहीण योजना बंद पाडड्यासाठी महा विकास आघाडीचे नेते कोर्टामध्ये गेले. होते. परंतु त्यांनाच या लाडक्या बहिणींनी घरी बसवले असल्याचा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी लगावला
मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील विकास काम आणि योजनांच्या माध्यमातून १२०० कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने दिला. एकट्या हिवर गाव पावसा गावाला १२ कोटी रूपयांचा निधी दिला असून, तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लावायची आहेत. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प राज्या तील महायुती सरकराचा असून, या जिल्ह्यासाठी अतिरीक्त पाणी निर्माण करण्याचे शासानाचे धोरण आहे. अनेक वर्षे या तालुक्यात महीलांच्या डोक्यावरील हांडा उतरू शकला नाही. या तालुक्यातील जलनायकांच्या ठेकेदारांनीच पाणी पुरवठा योजनांचा निधी खिशात घातला. त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशारा देवून साकूरच्या उपसा सिंचन योजने बरोबरच भोजापूर चारीचे काम पूर्ण करून जिरायत भागाला पाणी देणार असल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले.
निळवंडेचे पाणी आले असले तरी त्या वितरीकांची कामे सुरू करण्याकडे जल संपदा विभागाचा प्राधान्यक्रम राहणार आहे. मध्यप्रदेश मधील मोहनपुरा या जलाशयाच्या धर्तीवर आपल्याकडेही पाइपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा विचार केला जात असून पी डी एन व्यवस्था समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले
आ.अमोल खताळ म्हणाले की, या तालुक्यात जनतेने केलेल्या परीवर्तना नंतर खऱ्या अर्थाने विकास गंगा सुरू झाली आहे. तालुक्यातील दहशत संपली असल्याने इतिहासात प्रथमच सामान्य कुटुंबातील एक तरूण आमदार होवू शकला. ना.विखे पाटील यांच्या माध्यमा तून तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आश्वासित करून युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतनिर्माण करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
महंत एकनाथ महाराज म्हणाले की, आज तालुक्यात बदल झाला आहे. आता घाबरून चालणार नाही. सर्वच बाबतीत तालुक्यात सतांतर होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदूत्वचा मुद्दा घेतला, राज्यात परिवर्तन झाले. आता हिंदूत्ववादी म्हणून काम करायचे असून सत्ता गेल्यानंतर काहींना धर्म आठवला असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला .
निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेल्या गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्याची मागणी प्रमोद राहणे यांनी केली विधानसभा निवडणुकीमध्ये शर्यतीचा पहीला टप्पा जिंकला आहे. अजून शर्यत जिंकायची असल्याने या तालुक्यात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यांनी या गावासाठी दहा लाख रुपयांचा सुध्दा निधी दिला नाही. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण.विखे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी या गावाला मिळाला असल्याचे भाजपचे उपाध्यक्ष गणेश दवंगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उत्तम जाधव यांनी केले सूत्रसंचालन भाजपचे माजी तालुका ध्यक्ष काशिनाथ पावसे यांनी केले स्वागत भाजपचे उपा ध्यक्ष गणेश दवंगे यांनी केले तर आभार शिवसेना अल्पसंख्यांकचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव यांनी मांनले यावेळी सोमनाथ दवंगे.रावसाहेब जाधव,आशोक गोफणे, चंद्रशेखर गडाख,. सुरेश पावसे, चांगदेव गडाख, मच्छिंद्र गडाख, कैलास दिवटे, दिलीपनाना पावसे,राजू शेटे,किरण पावसे सोमनाथ पावशे .सचिन सस्कर, भारत गोफने, नारायण पावसे (PSI), प्रकाश पावसे, दादासाहेब गडाख, भाऊ साहेब बोराडे,कैलास गोफणे .बाबासाहेब पावसे, माधव दवंगे, यांच्या सह महा युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
