शिर्डी । झुंजार न्यूज
2024 ची विधानसभा रणधुमाळी सुरु झाली होती दक्षिण नगरमध्ये लोकसभेतून झालेला पराभव डॉ सुजय विखे पाटील यांच्या जिव्हारी लागला त्यातून संगमनेर विधानसभा लढविण्याची खूणगाठ बांधत तन – मनाने व गमिणी कावा पध्दतीने चक्रव्युह रचना आखण्यात आली त्या दृष्टीने पाऊले उचलली गेली . एक एक सभा गाजत गेल्या तरुणाईचा उत्साह बघून डॉ विखे जोमात असतानाचं “धांदरफळ राडा ” झाला आक्रमता राहिली मात्र थोराताच्या भोवती निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे व राज्यात वेगळ्या पध्दतीचा संदेश गेल्याने वंजीराला रणनिती बदलावी जरूर लागली मात्र पर्याय देत ध्येय तेचं ठेवले . धांन्दलफळ घडले नसते अन्यथा आजची राजकिय वेगळी असती सुजय विखे पाटील हे आमदार असते त्वांना पुर्नवसन करा म्हणण्याची वेळचं आली नसती .
अहिल्यानगर येथे झालेल्या महायुतीच्या नूतन आमदार सत्कार प्रसंगी डॉ सुजय विखे पाटील यांनी आपली खदखद व्यक्त केली . ” मी आजी होतो तेव्हा सर्व माजी होते , आता मी एकटाचं माजी आहे आणि सर्व आजी आहे , ” मला भाषणा पुरतेचं ठेवू नका नाही तर लोक मला विसरतील , “माझे पुर्नवसन करा ” अशी थेट मागणी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री वडील राधाकृष्ण विखे पाटील , विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह जिल्हयातील आमदार , पदाधिकारी यांच्या समोर केल्याने जिल्ह्यात एकच. होवू लागली आहे .
2024 म्हणजे डॉ सुजय विखे पाटील यांच्या अधोगतीचे वर्ष लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरु झाली 2014 पासून मोदी लाटेचा करिष्मा दिसत होता . या लाटेत सर्व काही अलबेल होते मात्र शिर्डीतून रामदास आठवले यांना तिकीट नाकारल्याने दलित समाज्यात नाराजी निर्माण झाली . याचा ही मोठा फटका विखेंना बसला . मोदी लाटेत लोकसभेच्या निवडणुकीत महायुती ही ग्राफिल राहिल्याने महाविकास आघाडीने बाजी मारली यातून विधानसभेला राज्यात फडणवीस तर अहिल्यानगर जिल्हयात डॉ सुजय विखे पाटील यांनी गमिणी कावा केल्याने १२ पैकी १० जागेवर विखे यशस्वी होत त्यांनी आपल्या लोकसभेच्या पराभवाचा एक प्रकारे वचपाचं काढला .
विधानसभा निवडणुकी दरम्यान दि. १९ ऑक्टोबर २०२४ वेळ सायंकाळची वेळ होती , डॉ सुजय विखे पाटील हे संगमनेर विधान सभा मतदार संघातील प्रचाराची सांगता सभा संपवून जनसेवा कार्यालयात आले त्यांचा चेहरा व देहबेली ही उत्साही दिसत होती मात्र मनामध्ये काही प्रमाणात शंकाकुशंका दिसू लागल्या मात्र त्यांना विचारले असता ” दादा कशी काय सभा झाली संगमनेरची… ” दादा म्हणतात ” तुम्ही यायला पाहिजेल , खुप तुफान झाली सभा. मग त्यांना दुसरा प्रश्न कसे काय वातावरण आहे तिकडे, दादा म्हणतात तिकडे काय येवढे काही नाही पण … याचाच अर्थ असा झाला की सुजय विखे यांना संगमनेर बाबत त्यांचे मनात सांशकता होती हे शत प्रतिशत सत्य आहे .
निवडणुकीच्या दरम्यान शिर्डीत बाळासाहेब थोरात यांचा प्रार्दुभाव वाढल्याने संगमनेर विधानसभा लढण्यास मी इच्छूक असल्याचे डॉ सुजय विखे यांनी जाहीर केले होते. त्यास प्रत्युत्तरादाखल थोरात यांनी आपण नव्हे तर राधाकृष्ण विखे यांनी आपल्या विरुद्ध निवडणूक लढवावी असे खुले आव्हान दिले होते. त्यास दुजोरा देत राधाकृष्ण विखे यांनी सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे सांगितले. विखे यांची मागणी महायुतीच्या हायकमांड पर्यंत पोहचली परंतू तसा त्यांना कुणी विरोध ही केला नाही. पहिली सभा तळेगावात पार पडली यात थोरात यांना ओपन चॅलेज देत ” टायगर अभी जिंदा है। ” अशी डरकाळी फोडली. दुसरी सभा साकुरला झाली . तर धांदरफळ येथील तिसऱ्या सभेत देशमुख यांच्या वक्तव्याने ” राडा ” झाला. रात्रभर राज्यभर विरोधक
कडून निषेध व्यक्त झाले . स्वतः डॉ सुजय विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र प्रकरण मिटले नाही . या प्रकरणामुळे दुसऱ्या दिवशी सायंकाळची सभा अंभोऱ्यांत होणार होती . त्या सभेवर परिणाम होवू शकतो असे वातावरण निर्माण झाले असताना देखील सभा उत्स्फूर्तपणे दिसली . या सभेला तरुणाई उसळली . होती मात्र मतदान दिवशी धाकधूकचं होती . त्यानंतर संगमनेरमध्ये पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाला “आपण निवडणूक लढणार का ? ” या प्रश्नावर मिश्किल पणे म्हणाले ” योग्य उमेदवार दिला जाईल ” तेथेच सुजय विखे निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसा त्यांना महायुतीतील कोणत्याही पक्षाचा विरोध नव्हता. विखे यांनी सुचवल्या प्रमाणे तरीही नवख्या अमोल खताळ यांना उमेदवारी बहाल केली. तुम्ही माघार का घेतली याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, पक्षाने मला उमेदवारी दिली नाही . मला युतीधर्म पाळावा लागला असा मध्यम मार्ग काढत ते अलगद संगमनेर मतदार संघातून बाजूला झाले. त्यांनी जर खरच हि निवडणूक लढवली असती तर ते आज संगमनेरमधून आमदार असते. व माझे पुर्नवसन करा हे म्हणायची वेळ आलीचं नसती.
2024 हे वर्ष धोक्याचं गं बाई धोक्याचं म्हणीनुसार ला लोकसभा गेली , विधानसभेला धनुष्यबाण हाती घेण्या आधीचं देशमुखरुपी विघ्न , तर जिल्हयातून १२ पैकी १० पैकी जागा मिळवून दिल्याबद्दल साई संस्थान अध्यक्षपदाची लॉटरी लागणार होती मात्र ती वेळचं अजून आली नसल्याने काल – परवा झालेल्या कार्यक्रमातून “माझे ही पुर्नवसन करा” डॉ सुजय विखेच्या मागणीवरून २०२५ हे वर्ष राजकिय बढतीचे दिसणार यात तिळ मात्र शंका नाही

