संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

जोर्वे येथील लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने मागील सहा वर्षापासून इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वृक्षारोपण दंतचिकित्सा असे विविध उपक्रम राबवण्यात येत असून यावर्षी 121 तरुणांनी रक्तदान केले तर 51 गरीब कुटुंबीयांना पाणी जार चे वाटप करण्यात आले.

 

 

 

Oplus_131072

 

जोर्वे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम झाले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात ,विठ्ठलराव काकड ,संजय थोरात, माणिकराव यादव, सुरेशराव थोरात, सुरेश काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, शेतकी संघाचे मॅनेजर अनिल थोरात, के के थोरात ,राजेंद्र दिघे ,भाऊसाहेब शिंदे ,नामदेव शिंदे ,दगडू जाधव, डॉ. विश्वनाथ इंगळे , हर्षल काकड, रमेश दिघे, राजेंद्र थोरात, दिगंबर इंगळे,पराग थोरात ऋषी थोरात, गणेश इंगळे , अशोक थोरात, शरद गिरी, नानासाहेब दिघे , पप्पू जोशी , सागर भवर ,भाऊसाहेब दिघे, सोमनाथ काकड, विठ्ठल जाधव, भैय्या शेख, सतीश थोरात, अमित थोरात, अमोल शिरसागर, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Oplus_131072

यावेळी एसएमबीटी संस्थेच्या वतीने दंतचिकित्सा शिबिर संपन्न झाले .याचबरोबर गावातील 51 गरीब कुटुंबीयांना पाणी जारचे वाटप करण्यात आले. तर  प्रवरा नदीकाठी व गावठाणातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

Oplus_131072

 

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जोरवे ही आपली मातृभूमी असून येथून प्रत्येक कामाची ऊर्जा सर्वांना मिळते. जोर्वे गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून तालुक्याच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम या गावाच्या माध्यमातून झाले आहे. नव्या पिढीला एक आदर्श देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून एकजुटीने या पुढील काळातही सर्वांनी काम करायचे आहे. दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचणार असतात त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

Oplus_131072

सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, इंद्रजीत भाऊ थोरात यांनी सातत्याने सहकाराबरोबर जोर्वे गावच्या विकासासाठी काम केले आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात मदत करताना गावचा विकास आराखडा तयार करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविल्या आहेत. कुशाग्र बुद्धी आणि कामाची तत्परता हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असल्याचे त्या म्हणाल्या

 

 

 

Oplus_131072

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची ही भूमी असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गावचे नाव राज्यात नेले आहे. इंद्रजीत भाऊ थोरात यांनी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने गोरगरिबांच्या सेवेसाठी काम केले असल्याचे त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोल्हे यांनी केले तर रावसाहेब गायकवाड यांनी आभार मानले .यावेळी जोरवे गावातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *