पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील कै. मच्छिंद्र रेवजी तांबे यांचे नुकतेच हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ६७ वर्ष होते . ही दुःखद बातमी समजताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांन तांबे यांच्या कुंटुंबाला भेट देवून कुंटुंबाचे शांत्वन करुन त्यांच्या मुलांना धीर दिला .

 

 

Oplus_131072

 

 

 

कै. मच्छिंद्र तांबे हे सयमी व निर्मळ स्वभावाचे होते . तरुणपणी नाटकामधून एक सुरेख कलावतीची भूमिका पार पाडत आपल्या पंप्राच्याला हातभार लागावा म्हणून ड्रायव्हर म्हणून काम करत आपला मुलांना सुसंस्कृत व कर्तबगार बनविले . मात्र नियतीच्या पुढे काही चालत नाही त्यांचे चालता – बोलता अचानक दुःखद निधन झाल्याने संपुर्ण गावात शोककळा पसरली .

 

 

Oplus_131072

 

त्यांच्या पश्चात दोन मुले , दोन मुली , पत्नी , भाऊ , पुतणे , सुना , जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे . नाशिक येथील रामबंधू परिवारातील कर्तव्यदक्ष अधिकारी रविद्र तांबे यांचे ते वडील होते . 

 

 

 

यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात , शिबलापूर माजी संरपच प्रमोद बोंद्रे , ॲड सदाशिवराव थोरात , प्रा.रामराव पवार , भारत गीते आदी उपस्थित होते .

 

 

 

दशक्रीया विधी गुरुवार दि १० एप्रिल २०२५ रोजी हनुमान मंदिर शेजारी पानोडी येथे होईल .

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed