दोघा वाळू तस्करासह डंपर चालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारा तील तनपुरवाडी रस्त्यावरती आ अमोल खताळ यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ३ ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्याहवाली केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एका डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे

 

 

Oplus_131072

 

आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावरून वाळूने भरलेला डंपर येताना दिसला. त्याचक्षणी स्वतः आ खताळ यांनी आपले वाहन थांबवत खाली उतरले आणि त्या डंपर चालकाकडे विचारपूस करत चांगलेच धारेवर धरले त्यावेळी डंपर चालकाने उडवा उडविची उत्तरे दिली

 

 

 

Oplus_131072

 

त्यानंतर स्वतः आमदार अमोल खताळ यांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना भ्रमण ध्वनी वरून दिली आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या आदेश दिले त्यानुसार महसूल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पथकाने वाळूने भरलेला १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण १० लाख प१५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

 

 

 

 

याबाबत संगमनेर शहर पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालक अरबाज इसाक इनामदार वय 24 वर्षे रा सावरगाव घुले ता संगमनेर तसेच वाळू तस्कर शुभम सारंगधर वामन रा कोल्हे वाडी ता संगमनेर व गोरख हासे (पूर्ण नाव माहित नाही) रा समनापुर याच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे हे करत आहे

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बाळू उपसा सुरू आहे मागील दीड ते दोन महिन्याच्या पूर्वी आमदार अमोल खताळ यांनी जोर्वे नाक्या जवळ वाळूने भरलेला पिकअप पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केला होता त्यानंतर अवघ्या दीड ते दोनच महिन्यातच आमदार खताळे यांनी स्वतः तनपुरवाडी जवळ वाळूंने भरलेला डंपर ताब्यात कारवाई केली पोलिस आणि महसूल प्रशासन नेमके करते तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *