तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रत्येकाचे एकरी ऊस उत्पादन वाढणार–सुरेश माने

हुमणी भुंगेरे जून महिन्यात कमी करता येणे शक्य

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी सभासद उत्पादक यांचे हित जोपासले आहे. कारखान्याने सातत्याने विविध योजना राबविल्या असून एकरी उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा व शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला नक्की लाभ होईल असा विश्वास ऊस तज्ञ सुरेश माने यांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर हुमणी भुंगेरे यांचा प्रादुर्भाव जून महिन्यात कमी करता येईल असे त्यांनी सांगितले.

 

 

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने निमगाव बुद्रुक, धांदरफळ, पेमगिरी येथे आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ॲड माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक विनोद हासे, नवनाथ आरगडे, रावसाहेब दुबे, रोहिदास पवार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब सोनवणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी बोलताना सुरेश माने म्हणाले की, उसावर वाढलेला हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मे आणि जून महिन्यामध्ये जास्त प्रमाणात कमी करता येतो. या काळामध्ये हुमणीचे भुंगेरे बाहेर पडतात आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण अडकवले तर ते नक्की आपण कमी करू शकतो यासाठी कारखान्याने विविध उपाय योजना शेतकऱ्यांना दिले आहेत.

 

 

 

जास्त उत्पादन काढण्यासाठी जास्त पाणी न वापरता ठिबक सिंचन चा वापर केला आणि सेंद्रिय द्रव बरोबर उसामधील अंतर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व शेतकरी जूनमध्ये लागवड करतात आणि मग ऊस तोडी साठी एकाच वेळी सर्व ऊस येतो म्हणून टप्प्याटप्प्याने ऊस लागवड केल्यास ऊस तोडणी सुद्धा त्या पद्धतीने येईल.

 

 

 

ऊस क्षेत्रामध्ये ए आय वापर करणे शक्य असून यामुळे यामुळे खताचा व पाण्याचा कधी वापर करायचा याची माहिती आपल्याला मिळणार आहे. माधवराव कानवडे म्हणाले की ऊस आणि दूध हे शाश्वत पीक आहे शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने ऊस पिक घेण्याऐवजी त्यामध्ये अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला पाहिजे.

 

 

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की ऊस वाढव विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कारखान्याच्या वतीने विविध योजनांचे आयोजन करण्यात आले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले

 

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी भाऊसाहेब खराडे यांनी केले तर बाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले यावेळी परिसरातील शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed