पानोडी । झुंजार न्यूज
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या निळवंडे धरण व कालव्यातून आलेल्या पाण्यातून गावा गावात ओढे – नाले तळे भरले गेल्याने तालुक्याचा पुर्व भाग हा जलमय झाला असून यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणारे असल्याचे मत संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी मांडले

संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातून जाणाऱ्या निळवंडे कालव्याद्वारे गावा – गावात पाणी जावून तेथील लोकांच्या प्रयत्नातून ओढे – नाले , तळे भरली गेल्याने पिंपरणे , मालुंजे , डिग्रस , अंभोरे व पानोडी येथे भरलेल्या तळ्यातील पाण्याचे पुष्प व श्रीफळ टाकून पूजन रणजित सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी दूध संघाचे संचालक विक्रम थोरात , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , गोपाळराव थोरात , माणिक पाबळ , सूर्यभान थोरात , बाळासाहेब सानप , बाळू नागरे , भारत शेवाळे , ग्रा. प सदस्य दिनकर कदम , संतोष सांगळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले की , माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी व जिरायत भागाची दूरदृष्टी ठेवून गेल्या ४५ वर्ष निळवंडे धरण व कालवे तयार करण्यासाठी प्रयत्न केले . त्यातून आलेल्या कालव्याद्रारे पाणी हे ओढे – नाले व गांवतळ्यात पोहचविण्याकरिता सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या मार्फत पाईप पुरविण्यात आल्यामुळेचं गावा गावातील ऐन्य उन्हाळ्यात तळ्या मध्ये पाणी दिसू लागल्याने परिसर खरोखर जलमय झाला . यांचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होणार असल्याचे आनंद व्यक्त केला .

यावेळी रणजितसिंह देशमुख यांचा ग्रामपचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
