आश्वी | झुंजार न्यूज
गेल्या वर्षभरात वाळू लिलाव ठप्प असल्याने गोर गरिबांना मंजूर झालेले घरकुलाचे बांधकामे बंद राहिली त्यामुळे गोर गरिबांना मिळालेले घरकुल हे स्वप्नात दिसू लागल्याने त्यांचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षा उतरविण्याकरिता वाळू लिलाव त्वरीत चालू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी तहसिलदार , गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्रारे केली आहे .

विकास गायकवाड यांनी निवेंदनात म्हटले की , पंचायत समिती अंतर्गत तसेच ग्रामपंचायत अंतर्गत संगमनेर तालुक्यामध्ये घरकुल योजना चालू आहे पण वाळू उपलब्ध होत नसल्या कारणाने घरकुल योजनांचे कामे बंद आहेत. काम बंद असल्याकारणाने घरकुलाचा जो हप्ता आहे तो बांधकाम पूर्ण नसल्यामुळे मिळत नाही. तरी योजनेच्या ठरलेल्या काळात काम पूर्ण होणे अशक्य आहे. मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी घरकुलासाठी वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे, तरी सुध्दा वाळूचा लिलाव होत नसल्या कारणाने गोर गरिब लोकांना वाळू मिळत नसल्याने त्यांची मंजूर झालेली घरकूल केव्हा पूर्ण होणार यांची शाश्वती राहिली नाही गेल्या ६ महिन्यापासून आज वाळू भेटेल , उदया भेटेल असा एक एक दिवस पुढे जात असल्याने मंजूर झालेले घरकूल पूर्ण होत नाही त्यामुळे या लोकांना अनेक अडचणीशी सामना करावा लागत आहे .

तेव्हा लवकरात लवकर वाळू उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विकास गायकवाड यांनी निवेदनाद्रारे तहसिलदार यांना केली आहे .
Post Views: 663
