शुक्रवार, २१ जून रोजी बालपण स्कूलमध्ये 

 

 

 

 

 

पानोडी | झुंजार न्यूज

 

 

 

 

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक यांनी एकत्र येऊन योगाभ्यास केला आणि योग दिनाचे महत्त्व समजून घेतले.

 

 

शिक्षकांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना नियमित योगासने करण्याचे आवाहन केले.

 

 

 

त्यानंतर योग प्रशिक्षक फड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली. त्यामध्ये *सूर्यनमस्कार, सुखासन ,बद्धकोनासन त्रिकोणासन, वृक्षासन ,परिवरीत सुखासन अशा अनेक आसनांचा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला. योग प्रशिक्षकांनी प्रत्येक आसनाचे फायदे आणि ते योग्य प्रकारे कसे करावे याची माहिती दिली. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, दररोजच्या जीवनात त्याचे आचरण केले पाहिजे* हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.

 

 

 

Oplus_131072

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि त्यांना निरोगी जीवनासाठी प्रेरणा मिळाली. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी बालपण स्कूलच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच बालपण स्कूलचे प्रमुख सौ.सोनाली मुंढे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *