शिबलापूर l झुंजार न्यूज
घरकुल बांधणाऱ्यांना वाळूच्या खर्चातून दिलासा मिळाला आणि वाळू माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याची योजना राज्य शासनाने कार्यान्वित करण्यात आली . मात्र संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे नुकताचं सुरु झालेल्या वाळू डेपोतून घरकुलाच्या वाळूचा काळाबाजार ग्रामस्थांनी पकडलेल्या दोन डंपर चालकाकडे वाळू पावती न मिळाल्याने दिसून आल्याने ” वाळू ही घरकुलांच्या गोर गरिब लाभार्थीयांना मिळावी ही भूमिका घेत सात तास महसूल अधिकारी येवू पर्यंत ग्रामस्थ व तरुण आक्रमक भूमिकेत दिसल्याने अखेर त्या दोन डंपरवर महसुल विभागाने कारवाई केली .

शिबलापूर वाळू डेपोतून निघणाऱ्या डंपर चालकाकडून लाभार्थ्यांच्या नावावर उचललेल्या मोफत वाळूची बेकादेशीररित्या इतरत्र विक्री करीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आल्याने उपसंरपच सुनिल मुन्तोंडे , माजी संरपच सचिन गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील घरकुल वाळू लाभार्थी आक्रमक झाल्याचे दिसून आले . मंगळवारी सकाळी ११ वाजता शिबलापूर चौकातून दोन वाळू चे डंपर जात असताना उपसंरपच मुन्तोंडे यांना शंका आली त्यानुसार त्यांनी डंपरला थांबवत वाळू टाकण्याची पावती मागितली मात्र त्यांच्याकडे पावती न मिळाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांनी डंपर चौकामध्ये लावून घेत तहसिलदार यांच्यासह तलाठयांना फोनवर संपर्क केला मात्र ते सर्व मिटींगमध्ये असल्याने त्यांना शिबलापूर येथे येण्यास विलंब झाला ते साडे पाच नंतर तलाठयांनी शिबलापूर येथे येत व डंपर व चालकांना आश्वी पोलिस स्टेशनला घेवून जात त्यांच्यावर कारवाई केली .

राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार असल्यान आश्वी व परिसरातील अनेक घरकुल लाभधरकांनी ऑनलाईन नोंदणी करून घरकुलाच्या यादीत नाव समाविष्ठ केले मात्र अनेक महिने च्या प्रतीक्षेनंतर पाच सहा दिवसा पुर्वी शिबलापूर येथील वाळू डेपो सुरु झाला . त्यात ही वाळू चोरीचा सावळा गोंधळ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये शंकाकुशंका निर्माण होवू लागल्या आता गोर गरिबांना वाळू मिळेल का ? साहेब या गोरगरिब घरकुल लाभार्थीना प्राधान्याने वाळू दया अशी ग्रामस्थांनी भूमिका मांडली .
