आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातही निवडणूकीचे वारे वाहु लागले आहेत.

 

 

पिंप्री लौकी अजमपूर गावाचे रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते  तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस भारतराव गीते हे राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचीत असून वंजारी संघटनेचे ते राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर त्यांची पत्नी सौ सुनिता भारत गीते या पिंप्री लौकी अजमपूर च्या विदयमान संरपच आहे .

 

 

 

संध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद , पचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून हौसे – नवसे – गवस्यांना निवडणुकीचे डोऱ्हाळे लागू लागले असून इच्छुक हे बांशिग बांधून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे मग आश्वी गट मागे कसा राहिल जिल्हा परिषद गट हा सर्व साधारण पुरुष अथवा महिला तर आश्वी खुर्द पंचायत समिती गण हा ओ बी सी पुरुष अथवा महिला तर आश्वी बु॥ गण हा सर्व साधारण पुरुष अथवा महिला निघणार अशा चर्चा ह्या रंगतदार पध्दतीने होवू लागल्या आहे . त्यानुसार निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Oplus_131072

भाजपाचे जेष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे भारतराव गीते हे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गीते यांना कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपल्या सामाजिक कामात एक मोठा वर्ग निर्माण केला असल्याचे चित्र दिसत आहे .

Oplus_131072

भारतराव गीते हे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते असून पदमविभूषण स्व डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या मुशित तयार झालेले आणि नि:स्वार्थी , स्पष्टवक्ता व काम करण्याची धडपड म्हणून परिचित आहेत. आश्वीचं नव्हे तर संगमनेर तालुक्यात सुध्दा त्यांचा चाहता वर्ग , नाते संबंध निर्माण केल  असून यातूनचज त्यांचा जनसंपर्क वाढत गेला . गोरगरिबांना गरजवंताना मदतीचा हात देणारा कार्यकर्ता म्हणून गीतेची आगळी – वेगळी अशी ओळख निर्माण झालेली आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , सौ शालिनीताई विखे पाटील , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संरपच पत्नी सौ सुनिता गीते यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री लौकी अजमपूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गांवात विविध विकास कामांचा घोडदौड सुरु करत अनेक वर्षाचा पिण्याच्या प्रश्न आश्वी वरुन योजना आणून मार्गी लावला .

 

 

Oplus_131072

भारतराव गीते यांनी सामाजिक क्षेत्रातही आपल्या गावासह आश्वी जिल्हा परिषद गटात सामाजिक सलोखा तयार केला विविध क्षेत्रातील लोकांशी असणारे मैत्रीपुर्ण संबंध तसेच पत्रकारितेत एक वेगळा प्रवाहा निर्माण केल्याचे चित्र आहे .

 

विविध गावामध्ये विविध विकास कामां संदर्भात मित्र – परिवाराला कल्याणकारी योजना राबविण्याचा योग्य सल्ला देणे ही हातोटी गीते मध्ये बघावयास मिळते . आपल्या चौफेर व्यक्तीमत्वातून गीते यांनी वेगळा असा ठसा उमटवला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून निळवंडे च्या उजवा कालवा पूर्ण होवून कालव्या पाणी यावे याकरिता आंदोलने केली विखे पाटील यांच्यासह विविध मंत्र्यांना निवेदने देण्याची महत्वाची भूमिका बजावली . तर वेगवेगळ्या विषयांवर अनेक आंदोलन करून आपली जनमानसातील प्रतिमा उंचावली.

 

 

जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केल्याचे दिसत असताना भारतराव गीते हे कसे मागे राहतील सामाजिक यौध्दा म्हणून ते सदैव चर्चत असतात . जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी भाजपाचे तिकिट मिळवण्याच्या स्पर्धेत ते आघाडीवर दिसून येत आहे . सामान्य जनतेचे हीत जपणारा आणि लोकांना मदतीच्या वेळी हात देणारा कार्यकर्ता म्हणून भारत गीते यांच्या माध्यमातून नवा चेहरा आगामी होणाऱ्या निवडणुकीत लोकांसमोर दिसणार आहे. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *