संगमनेर । झुंजार न्यूज

 

येथिल अमृतवाहीनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील ५१ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. सिव्हील इंजिनिअरींग अंतीम वर्षामधील विद्यार्थांना किर्लोस्कर, न्युमॅटीक, सोपान, ओ एन्ड एम, एस. जे.
कॉन्ट्रॅक्टस, इनोव्हिजन इन्फ्रासोल, इंडोव्हन्स, आर. ए. टेक टेकसीस, पीमार एस इंफ्रा, सुरोज बिल्डकॉन, प्लानेज कन्सल्टन, इत्यादी. नामांकित कंपन्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड झाली आहे. अशी माहिती प्राचार्य प्राचार्य, डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्महणाले कि , महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट वृद्धीसाठी सॉफ्ट स्कील ट्रेनिंग, इंडस्ट्री व्हिजीट, वेगवेगळ्या नवनवीन विषयांवर कार्यशाळा, इंटर्नशीप प्रोग्राम, जपान व जर्मनी भाषांचे प्रशिक्षण असे  विविधपूर्ण उपक्रम राबवले जात आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे सोफ्टवेअर प्रशिक्षण, गेट ट्युटर, ऑटोकॅड,रेव्हीट, आर्किटेक्चर, एस. डी. एस आणि टेक्लास्ट्रक्चर ट्रेनिंगसारखे उपक्रम राबवले जात आहेत. यासाठी करिअर डेव्हलपमेंट सेलचे प्रा.प्रवीण वाकचौरे, सिव्हील विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.निलेश खैरनार प्रयत्नशील आहेत.
             

 

सिव्हील इंजिनिअरींग विभागातील जवळ जवळ २२६ विद्यार्थी शासनाच्या सरळ सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तर्फे सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, पाणी पुरवठा, जलसंपदा, जीवन प्राधिकरण, नगर रचना या विभागासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून निवड होऊन आणि इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस या परीक्षांमधून निवड होऊन विविश शासकीय नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. 
           
Oplus_131072
आजपर्यंत स्थापत्य विभागातील २३२ विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून यशस्वी नवउद्योजक म्हणून काम करत आहेत. सिव्हील इंजिनिअरींग विभाग शासनाच्या उन्नत भारत, उन्नत महाराष्ट्र अभिमान, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन इत्यादी योजनांमध्ये सहभागी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन, नवी दिल्ली द्वारे चार वेळा नामांकन मिळालेले आहे.
   
Oplus_131072

       

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त तथा मा. आ. डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, सिव्हील इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. एस. बी. कांडेकर यांनी अभिनंदन केले.
https://youtu.be/Krvsja0fTJg
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed