संगमनेर । झुंजार न्यूज

महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या आदेशानुसार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर व तालुक्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती (१७सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत ‘ सेवा पंधरवडा अभियाना’ चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ता मेळाव्यात शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे यांनी सर्वांना संबोधीत केले. भाजप प्रदेशतर्फे जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या कालावधीत आरोग्य, स्वच्छता, सामाजिक उपक्रम, व्याख्यान, सन्मान सोहळे, प्रदर्शने आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

 

अभियानाचे संयोजक अशोक टेकने यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याबाबत सविस्तर दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर (जिल्हास्तर) तसेच स्वच्छता अभियान (बुथस्तर) याच दिवशी ते २४ सप्टेंबरदरम्यान आरोग्य शिबिरे, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने, १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रक्तदान शिबिराचा दुसरा टप्पा (मंडल स्तर), १९ व २० सप्टेंबर रोजी मोदीजींच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन व पुस्तक वितरण होईल. २२ व २३ सप्टेंबरला राजकीय विशेष व्यक्तींचा सन्मान (प्रदेश स्तर) व दिव्यांग व्यक्तींसाठी उपकरणे वितरण २५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, पूजन, व्याख्यान, कार्यकर्त्यांची बैठक आणि घरोघरी भोजनाचे आयोजन, २७ व २८ सप्टेंबरला मोदी विकास मेळावा’ (युवा आणि महिला नेतृत्वासह) महानगरांमध्ये होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन, स्वच्छता अभियान, तसेच खादी आणि स्थानिक वस्तू खरेदीस प्रोत्साहन असे उपक्रम होणार आहेत. २ ऑक्टोबर रोजीच’ विकसित भारत चित्रकला स्पर्धा’ घेण्यात येईल. याशिवाय २९ ऑगस्ट ते २५ डिसेंबर दरम्यान’ खेलो भारत स्पर्धा’ ग्रामिण, ब्लॉक व लोकसभा क्षेत्रांमध्ये होणार आहे.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक इथापे, रामचंद्र जाजू, राजेंद्र सांगळे, काशिनाथ पावसे, वैभव लांडगे, सरचिटणीस अशोक नन्नवरे, रोहित चौधरी आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरचिटणीस साहेबराव वलवे यांनी तर आभार भारत गवळी यांनी मानले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed