झरेकाठी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार कर्तव्यनिष्ठ शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तर पालकांचे मन गहिवरून आले . या शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनातील मोलाचे संस्कार आणि प्रत्येकाला जगाचे ज्ञान दिले. सरपंच अशोकराव वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निरोप समारंभात संतोष गोसावी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

रेखा गोसावी , दिपाली पवार आणि मंगल खेमनर या शिक्षकांच्या योगदानाला आदराने उजळा देण्यात आला . शिक्षकांच्या कार्यकाळात शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन , शैक्षणिक सहल ,शाळा परिसर सुशोभिकरण, विद्यार्थी गुणवत्ता वाढ यासारखे विविध उपक्रम राबवले गेले.

 

 

गावाच्या आसपास चांगल्या शाळा असतानाही या शिक्षकांनी आपल्या निस्वार्थी मेहनतीने शाळेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. मान्यवरांनी बदलून गेलेल्या शिक्षका विषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या कामाचे कौतुक करून नव्याने आलेल्या शिक्षकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा केली .

 

 

यावेळी नव्याने आलेले विनोद उर्किडे ,प्रीती खालकर ,बाळकृष्ण भालेराव व साठे मॅडम यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला . बदलून गेलेल्या शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन व भेटवस्तू तसेच शाळेलाही भेटवस्तू देण्यात आली.

 

या कार्यक्रमासाठी पोपटराव वाणी, पद्मश्री कारखान्याचे माजी संचालक पोपटराव आनंदराव वाणी.सुनंदा वाणी ग्रामपंचायत सदस्य मनीषा वाणी , सुनिता वाणी, मंगल वाणी, विजय वाणी, अनुराधा वाणी, प्रियंका वाघचौरे, मंगल पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संभाजी व्यवहारे, उपाध्यक्ष गोरक्ष निवृत्ती वाणी, सोसायटीचे अध्यक्ष जिजाभाऊ वाणी , सुदाम वाणी , सोमनाथ डोळे , सोन्याबापु वाणी , लक्ष्मण वाणी, विलास वाणी,गोरख वाणी , सुहास वाणी , भारत वाकचौरे, अमोल वाणी, राहुल वाणी,अभिनव, वाणी, , मनोहर वाणी , राजेंद्र वाणी, सुनील वाणी, गणेश वाकचौरे, आदिनाथ वाणी, बीबन तांबोळी, मंगेश शिंदे, रवींद्र वाणी, मदन म्हंकाळे, याकोब म्हंकाळे, शमीर तांबोळीअंगणवाडी सेविका व मदतनीस व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन आलेले शिक्षक विनोद उर्किडे सर यांनी केले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed