संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

व्यंगचित्र हि अशी कला आहे जी तुम्हाला नकारात्मक विचार मनात बाळगून असता त्यावर मात करायला शिकविते. सकारात्मक ऊर्जा मिळविण्याचे साधन अनेक आहेत पण ‘हास्य’ तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते.  टीव्ही नकारात्मक आणि भीतीदायक बातम्या देतात , मोबाईल आभासी  जग आहे, त्यातून नकारात्मक ऊर्जा मिळते. आनंद मिळतो तो क्षणिक असतो मात्र दुष्परिणाम मोठा असतो. अशावेळी एक व्यंगचित्र / हास्यचित्र पाहिलं कि क्षणभर आनंद मिळतो. १२ ते १७ वयाचा टप्पा हा कर्तृत्व घडविण्याचा टप्पा आहे. आयुष्यात चार ते पाच वर्ष मिळतात, हेच असतात तुमचं स्वप्न साकारण्याचे” असे उद्गार प्रसिद्ध व्यंगचित्रकार, व्याख्याते अरविंद गाडेकर यांनी काढले.

 

ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीचे श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी बहि:शाल शिक्षण मंडळ आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेत ‘ रेषा बोलतात, रेषा हसवतात ‘ या विषयावर व्याख्यान करताना बोलत होते.

 

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर, अभ्यासातील अडथळे, जुन्या वाईट सवयी, सोशलमीडियाचा अयोग्य वापर याविषयी मार्गदर्शन केले.

 

यावेळी व्यासपीठावर श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डीचे प्राचार्य प्रा.डॉ. संतोष औताडे , प्रा.बाळासाहेब औताडे सर , प्रा. मोटे सर , प्रा.डॉ.वडीतके मॅडम , प्रा. तक्ते सर, प्रा. खेमनर सर आणि प्राध्यापकवृंदसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed