{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

३७ जणाचे बळी, तर जेलबंद बिबट्याच्या देखभालीचे वनविभागावर मोठे आव्हान

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

 

संपूर्ण अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात सध्या बिबट्यांच्या वाढत्या संख्येने आणि हल्ल्यांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. मिळालेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, जिल्ह्यात बिबट्यांची संख्या तब्बल ११५० वर पोहोचली आहे. या वाढत्या संख्येमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला गेला असून, आतापर्यंत जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

 

 

जिल्ह्यातील बागायती क्षेत्र आणि उसाच्या शेतीमुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. प्रामुख्याने कोपरगाव, संगमनेर, पारनेर, नगर, अकोले, श्रीरामपूर, राहता आणि राहुरी या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर सर्वाधिक असून येथे त्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या होणारे बिबट्याचे दर्शन आणि जनावरांसह माणसांवर होणारे हल्ले यामुळे शेतकरी व ग्रामस्थ जीव मुठीत धरून जगत आहेत.

 

 

वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने ॲक्शन मोडमध्ये येत विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत. वन विभागाच्या तत्परतेमुळे आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात २५ ते ३० बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. तरीही मोकाट फिरणाऱ्या बिबट्यांची संख्या मोठी असल्याने धोका अद्याप टळलेला नाही.

 

जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी अनेकांची रवानगी राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील रोपवाटिकेत (नर्सरी) करण्यात आली आहे. सद्यस्थितीत डिग्रस येथे ११ बिबटे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ७ नर आणि ४ मादी बिबट्यांचा समावेश आहे.

बिबट्यांना पकडणे जितके कठीण आहे, त्याहून अधिक कठीण त्यांना जेरबंद केल्यानंतर सांभाळणे बनले आहे. डिग्रस येथील केंद्रात असलेल्या बिबट्यांच्या खाण्यापिण्याची सोय, त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता पाहण्याची मोठी जबाबदारी सध्या वन विभागाच्या खांद्यावर आहे. वाढती संख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे वन कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे.

एकंदरीत, ११५० ही संख्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून, शासनाने आणि वन विभागाने यावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे .

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *