देश – विदेशातील २० नामवंत शास्त्रज्ञ झाले सहभागी
संगमनेर । झुंझार न्यूज
येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाच्या २९ विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रकल्पांसह अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित टेक कुंभ 2025 या भव्य परिसंवादात देश-विदेशातील २० नामवंत शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या समवेत सहभाग नोंदवून संगमनेरच्या शैक्षणिक गुणवत्तेची ठसा उमटवला. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या सर्जनशीलतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये गणित, विज्ञान व तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत विविध प्रकल्प विद्यार्थ्यांकडून साकारले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व तांत्रिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
आधुनिक शिक्षणपद्धतीत तंत्रज्ञानाचा प्रभाव झपाट्याने वाढत असून विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग मानवतावादी व समाजोपयोगी कार्यासाठी होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच आय.ई.ई.ई. अँटेना प्रोपागेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. क्रिस्तोफ फुमॅक्स यांनी केले.
भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अत्यंत सक्षम असून तंत्रज्ञानातील सातत्याने होणाऱ्या बदलांनुसार आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाला विकसित राष्ट्र बनवून ग्रामीण समाजाचा जीवनमान उंचावणे काळाची गरज असल्याचे आवाहन सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव सुमंत कोल्हे यांनी सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक प्रा. बाबा खरात, आय.टी.सी. विभागप्रमुख डॉ. आर. पी. लबडे, समन्वयक चेतन मुर्तडक, सह्याद्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य खेमनर एस. एम, उपमुख्याध्यापिका दिघे एस. ए., पर्यवेक्षक रणशूर एस. आर., देशमुख के. डी., दिघे ए. टी. विज्ञान शिक्षक राठोड पी. डी., वायाळ एम. एस.चेतन मुर्तडक तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी मोलाचे योगदान दिले. :

