संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावच्या सरपंच सौ संगिता भारतराव गिते यांना सरपंच सेवा संघ (म राज्य ) यांचा राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने अहिल्यानगर येथे महंत कालिदास महाराज ( उज्जैन ) व सिने अभिनेत्री रुचिता देसाई यांचे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .

पिंप्री लौकी अजमपुर गावचा सर्वागिण विकास हा राज्याच्या जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे गावात व गावाला जोडणारे रस्ते गावाअंतर्गत रस्ते शाळा महाविद्यालय स्मशानभूमि पिण्याचे पाणी सांडपाणी तलाव जलसंधारण सह दलित वस्ती सुधारणा प्राथ आरोग्य केंद्र स्ट्रेट लाईट इ गावाच्या विकासाचे महत्वाची कामे मार्गाला लावुन गाव विकासाकडे वाटचाल करित आहे मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श गांवाकडे गावाची वाटचाल चालु असुन यामध्ये गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच राज्य पातळीवर आदर्श गांव निवड होईल असा विश्वास आहे

या गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय पशुवैदकिय दवाखाना राष्रीयकृत बॅक भव्य सांस्कृतिक भवन ही कामे लवकरच मार्गाला लागतील असा आशावाद सरपंच सौ संगिता गिते यांनी व्यक्त केला
याप्रसंगी बाबासाहेब पावसे प्रविण खेडकर सरपंच सतिश जोशी सुरेशराव मुंढे राजेश गायकवाड आदि उपस्थितित होते .
त्यांच्या निवडीचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पा ना सौ शालिनीताई विखे पा युवानेते खा सुजयदादा विखे पा उपसरपंच बाजीराव गिते ग्राम सदस्य चित्रा गिते मनिषा गिते संगिता गिते लक्ष्मीबाई दातीर उज्वला दातीर अनिल गिते दौलत दातीर चांगदेव कदम विकास दातीर ग्रामविकास अधिकारी भरत सोनवणे क्लर्क संतोष दातीर सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे

