सात्रळ । झुंझार न्यूज
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. याच परंपरेचा भाग म्हणून, सात्रळ येथील ‘प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्राचार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

CBSE पॅटर्नवर आधारित शिक्षण
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने या शाळेत CBSE (Central Board of Secondary Education) पॅटर्न राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील बालकांना सुरुवातीपासूनच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेने या शाळेची निर्मिती केली आहे.

या वर्गांसाठी प्रवेश सुरू
शाळेत सध्या खालील वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे
-
ज्युनिअर केजी (Junior KG)
-
सिनिअर केजी (Senior KG)
-
इयत्ता पहिली (Std. I)
-
इयत्ता दुसरी (Std. II)
अत्याधुनिक सोयीसुविधा आणि प्रशस्त परिसर:
प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूल हे सात्रळ येथील ‘प्रवरा शैक्षणिक संकुल’, वरिष्ठ महाविद्यालय कॅम्पसमध्ये (सोनगाव रोड जवळ, माळेवाडी-डुक्रेवाडी रोड) वसलेले आहे. निसर्गरम्य आणि शैक्षणिकदृष्ट्या पूरक अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे भर दिला जातो. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनुभवी शिक्षक आणि आधुनिक शैक्षणिक साधने येथे उपलब्ध आहेत.

आपल्या पाल्याचा पाया भक्कम करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी पालकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 ९८८१५०८६२३
📞९९७५४०४८८८
ठिकाण: प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूल, सात्रळ
Post Views: 654
