संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे मुळगंगामाता यात्रोत्सवानिमित्त एक अनोखा आणि भक्तिमय सोहळा पार पडला. शिवसेना महायुतीच्या कार्य कर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या वजनाएवढा गुळ वाटून ‘शेरणी तुला’ करत पूर्वी केलेला नवस फेडत नवसपूर्ती केली

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी चंदनापुरीतील महायुती कार्यकर्त्यांनी आमदार खताळ विजयी व्हावेत, यासाठी मुळगंगामातेपुढे नवस केला होता. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर यात्रोत्सवाचे औचित्य साधत हा नवस फेडण्यात आला. यावेळी आमदार खताळ यांनी चंदनापुरी येथील जागृत देवस्थान असलेल्या मुळगंगा माता मंदिरात विधिवत पूजा-अर्चा केली आणि देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते महाआरतीही पार पडली. “मुळगंगा माता की जय” अशा घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय झाले. यानंतर गावातून आमदार खताळ यांची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात ही मिरवणूक पार पडली.

 

या सोहळ्यात आमदारांना मुळगंगा मातेची काठी नाचवण्याचा मान देण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. यावेळी चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद राहणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, शिवसेना संगमनेर खुर्द गटप्रमुख श्याम राहणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम राहणे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख सागर राहणे देवस्थान समिती अध्यक्ष संदीप राहणे नितीन राहणे डी टी राहणे एम डी राहणे रवींद्र राहणे विलास राहणे ज्ञानेश्वर राहणे अक्षय गोफणे हरिदास राहणे भाऊसाहेब बोऱ्हाडे अमोल राहणे धनंजय रहाणे बाबासाहेब आकाश राहणे संकेत खुळे अमित राठी योगेश राहणे सचिन राहणे रहाणे सिताराम रहाणे कार्तिक राहणे अभिषेक राहणे गोकुळ राहणे नितीन राहणे अरविंद वाकचौरे सुरेश बोऱ्हाडे प्रवीण बोऱ्हाडे ऋषिकेश पवार शांताराम गोफणे रोहित शिंदे अक्षय राहणे भूषण जाधव शरद गोफणे सुयोग राहणे व सर्व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते

“मुळगंगा माता ही सर्वांचे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि मातेच्या कृपेने मी केलेला संकल्प पूर्ण झाला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. या यशामागे जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि देवीची कृपा हेच खरे बळ आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे. भविष्यातही जनतेची सेवा अधिक जोमाने करण्यासाठी मुळगंगा मातेने मला अशीच शक्ती, प्रेरणा आणि मार्गदर्शन द्यावे, हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे.”

 

अमोल खताळ (आमदार )
………………………………………..

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *