संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जाधव परिवार आणि कासारा दुमाला येथील देवकर परिवार यांचा शुभविवाह सोहळा मंगळवार, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला .

पानोडी येथील सौ. नंदाबाई व श्री. आण्णासाहेब महादु जाधव यांचे सुपुत्र चि. अमोल (M.Sc. IMCA) आणि कासारा दुमाला येथील सौ. मनिषा व श्री. दत्तात्रय नामदेव देवकर यांची सुकन्या चि. सौ. कां. भाग्यश्री (M.Com) यांचा हा विवाह सोहळा खांडगाव फाटा येथील ‘कुबेर एम्पायर’ येथे पार पडला.

या विवाह सोहळ्याला रामेश्वर (वरवंडी) येथील ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. मंगळवार, २४ मार्च रोजी दुपारी १२:३५ या शुभ मुहूर्तावर हा विवाह संपन्न झाला.


या विवाह सोहळ्याला माजी उपसरपंच विनायकराव थोरात , माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे, माजी उपसंरपच अशोकराव तळेकर, माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, रंगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, तसेच पत्रकार राजेश गायकवाड आदी मान्यवरांचा समावेश होता. यावेळी पानोडी आणि कासारा दुमाला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विवाह सोहळ्यासाठी ‘कानिफनाथ तरुण मित्र मंडळ, जाधव वस्ती (पानोडी)’ आणि जाधव-देवकर परिवार विशेष परिश्रम घेतले. श्री. रावसाहेब महादु जाधव , श्री. आण्णासाहेब महादु जाधव श्री. गणेश भाऊसाहेब जाधव यांनी पाहुण्यांच्या स्वागत केले .


उच्चशिक्षित वधू-वरांचा हा विवाह सोहळा संगमनेर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, या मंगल प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *