{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

शिबलापूर । झुंझार न्यूज

 

समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्वतःची भर घालून एकूण रुपये ३२,००० शैक्षणिक संस्थांना देणगी म्हणून देण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.

 

या पुरस्काराची मूळ रक्कम रुपये १५,००० इतकी असताना, त्यामध्ये स्वतःकडून अतिरिक्त रक्कम जोडून त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठा हातभार लावला आहे. स्वर्गीय आई वेणूताई व स्वर्गीय वडील निवृत्ती भाऊराव गिते यांच्या स्मरणार्थ प्रवरा माध्यमिक विद्यालय, शिबलापूर येथे रुपये ११,००० देणगी देण्यात आली.

.

यावेळी डॉ. गिते यांच्यासह प्राचार्य भारत दिवटे, सरपंच प्रमोद बोन्द्रे, माजी प्राचार्य आनंदाराव गिते, माजी प्राचार्य भिमराज बोन्द्रे, सुनील हिंगे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे तसेच इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कुटुंबातील अर्जुन गिते, संतोष गिते, राऊसाहेब गिते, किरण गिते आणि अश्विनी गिते यांचीही उपस्थिती होती.

 

याशिवाय, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा परिषद शाळा, शिबलापूर यांनाही रुपये २१,००० देणगी देण्याची घोषणा डॉ. गिते यांनी केली.

.

पुरस्कारातून मिळालेली रक्कम स्वतःच्या उपयोगासाठी न ठेवता शिक्षणासाठी अर्पण करण्याचा निर्णय हा केवळ उदात्त विचार नव्हे, तर समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी दर्शवणारा आहे. डॉ. गिते यांच्या या कार्यामुळे शिक्षण क्षेत्राला बळ मिळणार असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

 

सरपंच प्रमोद बोन्द्रे म्हणाले की , “डॉ. गिते यांनी पुरस्काराची रक्कम स्वतःसाठी न वापरता शिक्षणासाठी अर्पण करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळते. त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल.”

 

 

प्राचार्य भारत दिवटे सर म्हणाले की , “डॉ. गिते यांची शिक्षणाविषयीची बांधिलकी आणि सामाजिक जाणीव खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी दिलेली ही देणगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार असून, त्यांच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.”

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed