संगमनेर तालुक्यातील खळी येथील सुकन्या आणि संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांच्या कन्या अश्विनी चकोर-सांगळे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेतून त्यांची ‘मृदा व जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब’ या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे खळी गावासह संपूर्ण संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
मृदा व जलसंधारण विभागामार्फत राज्य निवड समितीच्या वतीने जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) या पदासाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या असलेल्या या परीक्षेत अश्विनी चकोर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर यश मिळवले. राज्य निवड समितीने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले असून, आयुक्त, मृदा व जलसंधारण कार्यालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने त्यांच्या निवडीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अश्विनी चकोर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले. त्यांनी संगमनेर येथील नामांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य (Civil Engineering) विषयात पदवी संपादन केली. केवळ तांत्रिक शिक्षणावर न थांबता, त्यांनी अहिल्यानगर येथून ‘एमबीए’चे (MBA) शिक्षणही पूर्ण केले. तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे.
अश्विनी या संगमनेर तालुका दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांच्या कन्या आणि नवनाथ सांगळे यांच्या पत्नी आहेत. ग्रामीण भागात राहून, जिद्दीच्या जोरावर शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशामध्ये कुटुंबाचा मोठा पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अश्विनी चकोर यांच्या या निवडीबद्दल माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख , नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ. मैथिली तांबे, जिल्हा सहकारी बँकेची संचालक गणपतराव सांगळे , भाऊसाहेब संतुजी थोरात कारखान्याचे संचालक दिलीप नागरे, सामाजिक कार्यकर्ते अनिलराव पाटोळे, खळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान सानप, भोलेनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब नागरे, दिलीप घुगे, कामगार पोलीस पाटील मच्छिंद्र चकोर, भारतराव गीते, शिबलापूर संरपच प्रमोंद बोंद्रे , प्राध्यापक सुधीर चकोर, खळी गावचे सरपंच विलास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील नागरे, बाळासाहेब चौधरी, चंद्रकांत डोळे , बाळासाहेब वाघमारे , झरेकाठी संरपच अशोकराव वाणी, सोन्याबापु लबडे , चंद्रभान तांबे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले .
ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर त्या कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, हे अश्विनी चकोर यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.