काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट

देशात मोठ्या भ्रष्टाचारामुळे अराजकता

कॉकरोच पार्टी हे भारतीय जनतेच्या मनातील असंतोष

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

सातत्याने जनतेचे काम, पक्षनिष्ठा प्रामाणिकपणा, शुद्ध आचार, विचार आणि व्यवहार असणारे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून भाजप प्रणित सरकारकडून देशात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारामुळे अराजकता वाढीस लागली असून कॉकरोच पार्टी ही असंतोषाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहाला त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी माजी प्रांताध्यक्ष तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे ,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सुधाकर जोशी, के.के. थोरात, विश्वासराव मुर्तडक, रामहरी कातोरे, सौ अर्चनाताई बालवडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सौ पद्माताई थोरात ,सौ प्रमिलाताई अभंग, निखिल पापडेजा, यांच्यासह विविध नगरसेवक व अमृत उद्योग समूहातील संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेतृत्व आहे. विविध जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळली असून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. एका निवडणुकीवर मूल्यमापन होत नाही. इतिहासामध्ये अनेक थोर पुरुषांच्या जीवनातही आलेख खालीवर झाला आहे. मात्र येणारा टप्पा यानंतर मोठा असतो. नियतीच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी चांगले आहे. संगमनेरकरांच्या मनामध्ये जे आहे ते माझ्याही मनात त असल्याचे ते म्हणाले.

कॉकरोच जनता पार्टी हे भारतीय जनतेमध्ये असलेल्या असंतोषाचे प्रतीक आहे. देवाधर्माच्या नावावरून जातीय धुर्विकरण केले जात आहे. देशामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असून पेट्रोल, डिझेल बाबत दररोज वाघाडी निघत आहे बेरोजगारी वाढली आहे शेतमालाला भाव मिळत नाही. अर्थव्यवस्थेची मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय बँकांमध्ये खडखडाट झाला आहे. संवाद महत्त्वाचा असून सोशल मीडियामुळे बदललेल्या संवाद ही क्रूर भावना झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना संघर्षाच्या भूमिकेत राहावे लागेल संघटन सुर्जन अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटनेचे चांगले काम होत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार यादी पुनर निरीक्षण मध्ये प्रत्येक बुथवर जबाबदारी घेऊन अत्यंत काळजीपूर्वक काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या देशांमध्ये डिझेल पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे .शेतमालाला भाव मिळत नाही. खरीप पिकाचा हंगाम सुरू होणार आहे. अशा काळात सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे मात्र सरकार काहीही करत नाही. एसआयआर मतदार पुनरनिरीक्षण प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बुथवर  बीएलओ 2 ची भूमिका करत मतदार नोंदणी मधून कुणीही अपेक्षित राहणार नाही याची काळजी घ्यावी  असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अविनाश सोनवणे ,उबेद शेख ,गणेश मादास ,नितीन अभंग ,नानासाहेब शिंदे, विलास वरपे ,अंकुश ताजने, रामनाथ कुटे , सौरभ कासार ,सुभाष दिघे, भारत बोराडे, दिलीप जोशी, भारत शेलकर, लाला पठाण, सुभाष पाटील गुंजाळ तात्या कुटे यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी स्वागत जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले तर अजय फटांगरे व सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले यावेळी युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात हे जाणते नेतृत्व

 राजहंस ही संकल्पना देशामध्ये संगमनेर मध्ये राबवली जाते आहे .दूध का दूध और पानी का पानी असे स्वच्छ पारदर्शक काम असणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे आचार विचार आणि प्रामाणिक असलेले नेतृत्व आहे. मोठा जनाधार असलेल्या या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे ते म्हणाले

संगमनेर हे सहकाराचे तीर्थक्षेत्र

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारातून संगमनेरचा सहकार घडला. सर्वसामान्यांचा विकास हा काँग्रेसचा विचार असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कार्य दीपस्तंभ प्रमाणे आहे. संगमनेरची ही भूमी सहकाराचे तीर्थ असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *