संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद क्षण
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्राच्या तमाशा या लोककलेसाठी आपले जीवन समर्पित करणारे रघुवीर खेडकर यांचा दिल्लीत पद्मश्री पुरस्काराने झालेला गौरव हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून संगमनेर करांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे गौरवउद्गार महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
लोककलावंत रघुवीर खेडकर यांना आज राष्ट्रपती भावनात राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री व विविध पद्मभूषण ,पद्मश्री, पुरस्कार विजेते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते
पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा रघु भाऊ यांनी जोपासला आहे तमाशा ही जिवंत कला असून या लोककलेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. सोशल मीडियाच्या जमान्यांमध्ये ही लोककला लोप पावते की काय अशी भीती असताना या जिवंत झालेल्या लोकमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे याचबरोबर महाराष्ट्र तमाशा मालक मंडळाचे ते अध्यक्ष असून तमाशा कलावंतांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
त्यांचा हा सन्मान संगमनेर कर म्हणून अत्यंत अभिमानाचा क्षण सर्वजण अनुभवत असून अहिल्यानगर जिल्ह्याला मिळालेला हा मानाचा पुरस्कार असल्याचे सांगून रघुवीर खेडकर यांच्या निमित्ताने तमाशा क्षेत्रातील एका सच्चा कलावंतांचा गौरव झाला असल्याचे ते म्हणाले
पद्मश्री रघु भाऊ सच्चा कलावंत
रघु भाऊ या नावाने परिचित असलेले संगमनेरचे रघुवीर खेडकर हे सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आहे कलेबरोबर अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी जनतेची सेवा केली आहे आयुष्यभर लोककलेची प्रामाणिक सेवा करणाऱ्या सच्चा कलावंतांचा हा सन्मान तमाशा क्षेत्राबरोबर संगमनेर करांसाठी अत्यंत आनंदाचा असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.
तमाशा फड सांभाळताना राज्यभर विविध कलाकारांची जबाबदारी घेऊन रघु भाऊ यांनी अत्यंत समर्थपणे त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले. कलावंतांचे अनेक प्रश्न असून पद्मश्री पुरस्कारामुळे इतर कलावंतांना ही समाजामध्ये नक्कीच मानसन्मान मिळेल असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
समई नृत्याला देशाची दाद सौ दुर्गाताई तांबे
रघु भाऊ यांनी समयी व थाळी नृत्य हे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय केले आहे त्यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने दिल्ली दरबारी महाराष्ट्राची लोककला दाखल झाली असून आयुष्यभर तमाशाची सेवा करणाऱ्या रघु भाऊच्या या कार्याचा गौरव आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद असून समई नृत्याला देशाने दिलेली दाद असल्याचे सौ दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे.
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे संगमनेरच्या सुपुत्राचा राष्ट्रपती भवनात झालेला सन्मान सोहळा हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंददायी ठरला आहे.
रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, डॉ मैथिलीताई ताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, तमाशाचे अभ्यासक साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर, रणजीत सिंह देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे
