.
झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ चणेगांव यांच्या नियोजनातून उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी ग्रामस्वच्छता,पर्यावण संरक्षण,सामाजिक सलोखा,कृषी विषयक जनजागृती आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,हरीपाठ,जाहीर हरिकीर्तन उत्साहात संपन्न झाले .

सप्ताह काळात संपूर्ण चणेगांव परिसर भक्ती रसाने न्हाऊन निघाला होता. घराघरात चैतन्यमय वातावरण होते.लेकी जावयांना निमंत्रीत करुन दारोदारी सडा,रांगोळी,पुष्पवृष्टिने संत महंतांचे औक्षण करून स्वागत होत होते.सप्ताहाचा शुभारंभ उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व जनार्दन स्वामी संस्थांनचे रमेशगिरीजी महाराज यांच्या अमृततुल्य प्रवचनाने झाला.दररोज सायंकाळी हरीपाठात पाऊली खेळतानां ग्रामस्थ, महिला, अबालवृद्ध देहभान विसरून सहभागी झाले होते.

सप्ताहात ऋषिकेश महाराज कुयटे,भाऊसाहेब महाराज पन्हाळकर,चैतन्य महाराज राऊत,तुकाराम महाराज शास्त्री मुंडे ,कृष्णाजी महाराज कमानकर,गोविंद महाराज गोरे,तुकाराम महाराज लाड यांचे जाहीर हरी कीर्तन संपन्न झाले.मृंदगाचार्य सचिन महाराज,गायनाचार्य मच्छिंद्र महाराज,रवी महाराज यांच्यासह आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.काला किर्तन सरला बेटाचे पीठाधीश्वर गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज यांचे झाले.यानंतर काला महाप्रसाद वितरण करण्यात आले. सप्ताह काळात संपूर्ण चणेगांव परीसर पंचक्रोशीतील भाविक भक्ती रसाने न्हाऊन निघाले.चैतनमय वातावरणातील भाविकांची मांदियाळी विशेश लक्ष वेधीत होती.


काल अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काल्याच्या कीर्तनासाठी अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांनी सप्ताहानिमित्त भाविकांना शुभ संदेश पाठवला होता तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात ,व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सत्यजित तांबे हे काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित होते.


शोभायात्रेतील रथ, संबळ वाद्य, महिला लेझिम पथक, वाजंत्री पथक, वारकरी पथक विशेष आकर्षण ठरले. त्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते .

याप्रसंगी काला महाप्रसादाचा संपूर्ण खर्च सुभेदार गोरक्षनाथ यमन ढमक यांनी केला होता त्याबद्दल सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केली

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *