माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थिती

संगमनेर । झुंझार न्यूज

 

गोरगरीब व आदिवासी बांधवांच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी कोळवाडे येथे सकाळी 10 वाजता भव्य आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या वतीने बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी सहा वाजता जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे या ठिकाणी हा भव्य आदिवासी मेळावा होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, शबरी माता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भाऊ बर्डे ,महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या उपाध्यक्ष गिरीजा पिचड, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, महिला प्रदेशाध्यक्ष सुनिता अहिरे, प्रदीप अहिरे, शरद पवार ,कल्पनाताई धारवड, सतीश पवार ,आशाताई बर्डे, संतोष माळी ,कैलास राजपूत, रावसाहेब ठाकरे, बाळू भिल्ल, सुरज माळी, रामदास पवार, राहुल माळी, रमेश पवार ,रवींद्र माळी, रामदास माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या आदिवासी मेळाव्यासाठी संगमनेर व अकोले तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *