महेश्वर फेस्टिव्हल दि.२२ ते २३ मार्च २०२३ पर्यंत सुरेगाव : झुंजार न्यूज कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी व उल्लेखनीय समजली जाणारी महेश्वर यात्रे निमित्त महेश्वर फेस्टिव्हल दि.२२ ते २३ मार्च २०२३ पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याची माहिती कोळपेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच चंद्रकला सूर्यभान कोळपे यांनी दिली आहे यावेळी प्रसिद्धी पत्रकात सौ कोळपे म्हणाले की जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी व उल्लेखनीय असलेले व नवसाला पावन होणारे श्री क्षेत्र महेश्वर यात्रा सालाबाद प्रमाणे संपन्न होणार असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहाटे ३ ते ५ या दरम्यान श्रींचा महाअभिषेक होणार आहे सकाळी काकड आरती मिरवणूक संपन्न होऊन सायंकाळी पारंपारिक बारागाड्या ओठण्याचा कार्यक्रम होणार असून पालखी सवाद्य मिरवणूक संपन्न होत असते यामध्ये पारंपारिक उत्सवामध्ये बैलगाड्या शर्यती ,नामवंत मल्लांच्या कुस्त्या हागामा यावेळी संपन्न होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जी. एस. चव्हाण प्रस्तुत साई सूर मैफिल संचलित स्वरानंद पाडवा पहाट,निर्मल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर तसेच लोकनाट्य तमाशा मध्ये लोकनाट्य तमाशा मंडळाचे नामवंत तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे
श्री क्षेत्र महेश्वर हे नवसाला पावणारे देवस्थान मांनले जात असून यात्रौत्सवाला ता.सिन्नर ता.निफाड,ता. येवला,जिल्हा नासिक ता. संगमनेर ,राहता,व राहुरी जि.अहमदनगर या भागातून महिला भाविक यात्रा काळामध्ये मंदिरात येऊन आपले नवस फेडतात सदर यात्रा उत्सव शिस्तप्रिय व शांततेत पार पाडण्यासाठी गावातील ज्येष्ठ व तरुण वर्गांना यात्रा उत्सव समिती मध्ये सामावून घेण्यात आले असून यात्रेसाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे
यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी सिध्देश्वर पतसंस्थेचे संस्थापक निवृत्ती कोळपे,कर्मवीर शंकरराव काळे कारखाना संचालक सुर्यभान कोळपे,सहकार महर्षि शंकरराव कोल्हे कारखाना संचालक राजेंद्र कोळपे ,माजी सरपंच गोरक्षनाथ कोळपे,माजी सरपंच राजेंद्र पोपट कोळपे माजी जि.प सदस्य बाबासाहेब कोळपे,सुरेगाव-कोळपेवाडी व्यापारी असोसिएशनचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गोळेचा, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कोळपे,ग्रामपंचायत उपसरपंच अनिल रखमा कोळपे सदस्य अर्जुन कोळपे,अर्चना संजय धनवटे,अलका गोरख कोळपे, निवृत्ती रखमा कोळपे ,सुनिता आदिनाथ कोळपे , सुखदेव कोळपे,शितल महेश कोळपे ,उज्वला राजू कोळपे ,सुनीता सागर कोळपे, गणेश पारचे ,प्रवीण कोळपे, सुनिता दत्तात्रय बेंडकुळे ,ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके तसेच ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहे .

यात्रा उत्सव कालावधीमध्ये येणाऱ्या महिला भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तू ,मोबाईल तसेच लहान मुलांचा सांभाळ योग्य पद्धतीने करावा सुरक्षितेचे विषयी कोणाला काही आढळल्यास तात्काळ कोळपेवाडी पोलिस दुरक्षेत्रास माहिती द्यावी असे आवाहन सरपंच चंद्रकला कोळपे व उपसरपंच अनिल कोळपे यांनी आवाहन केले आहे.
