आराध्य दैवत माता अंबिका देवी यात्रा दि 25 मार्च ते 26 मार्च 2023 दोन दिवशीय उत्सव होईल संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दाढ खुर्द येथील आराध्य दैवत माता अंबिका देवी यात्रा उत्सव निमित्त यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दाड खुर्द येथील माजी सरपंच संजय रघुनाथ जोशी तर उपाध्यक्षपदी गणेश चंद्रभान जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यात्रा नियोजन करिता झालेल्या बैठकीत यात्रा कमिटीची निवड झाली . यात कार्यकारणी पुढील प्रमाणे संरपच सतीश कुंडलिक जोशी , किशोर अशोक जोशी , सुनील बाळासाहेब जोशी , सुरेश दौलत बिरे , कैलास पुंजा जोरी , भाऊसाहेब नामदेव बोराडे , अमीर मिरासाहेब शेख , दत्तात्रय विठोबा पर्वत , बाळा मल्हारी पर्वत , रामदास भाऊसाहेब पर्वत , अशोक भागवत जोशी , राजेंद्र भाऊसाहेब जमदाडे , नारायण किसन कहार , गणेश भाऊसाहेब जोरी , तुकाराम यामाजी माळी , भारत नारायण पर्वत , संदीप शंकर नाईकवाडी , अनिल मारुती पर्वत , किशोर दादू वाघमारे , डॉक्टर राजेंद्र सिताराम साळवे , विजय बबन कहार , ज्ञानेश्वर रामचंद्र बनगया , भास्कर वाडगे , संजय सोन्याबापु पर्वत , कैलास बाबुराव जोशी , सुनील रावसाहेब जोशी , भागवत शांताराम जोरी , अण्णासाहेब गेनोजी जोशी , सर्जेराव तुकाराम जोशी , बाळासाहेब शिवराम साळवे , विठ्ठल भिमाजी जोशी , ज्ञानेश्वर नामदेव वाडगे आदीसह 35 लोकांची कार्यकारणी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सदस्य यात्रा कमिटी जाहीर झाली .
यात्रा कमिटीची मीटिंग सुरू होतात पहिल्यांदा अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली दाढ खुर्द गावामध्ये प्रामुख्याने विखे गट आणि थोरात गट दोन असून यावेळी विखे गटाच्या पुढाऱ्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला यावर आक्षेप घेत थोरात गटाचे श्री गणेश जोरी व किशोर जोशी यांनी अध्यक्ष तुमचा उपाध्यक्ष आमचा यावर बरेच वेळ चर्चा करत शेवटी तोडगा निघाला . सालाबाद प्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष च्या नावाची घोषणा तंटामुक्ती अध्यक्ष बाळा मल्हारी पर्वत यांनी केली त्याप्रमाणे संजय जोशी अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गणेश जोशी यांची निवड केली .
यावेळी या निवडीला अंबिका माता भक्तांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत टाळ्याच्या गजरामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत करून ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला दिनांक 25 व 26 यात्रा असल्याने मागील वर्षाच्या हिशोबाचे वाचन करत शिल्लक रकमेची गोळा बेरीज करून पुढील वर्षाची वर्गणी व कार्यक्रमाची ठरवत लोकनाट्य तमाशा मंडळ जंगी कुस्ती हंगामा लाइटिंग मंदिराला कलर हजेरी कार्यक्रम आधी महत्त्वाच्या विषयावर विचारविनिमय करून गावाच्या आराध्य दैवत माता अंबिका देवीची यात्रा उत्साहात साजरी करून गावातील सर्व भक्तगणांनी व नागरिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील व्हावे व यात्रेची शोभा वाढवावी असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले असून गावातील सर्व देवांना नारळ वाढवून यात्रा कमिटीने यात्रा उत्सवाला सुरुवात केली व यात्रेसाठी बाबा सर पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले
