संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यत (दि. ६ एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमासह भव्य बैलगाडा शर्यत व रक्तदान शिबिराचे ग्रांमस्थानी आयोजन केले आहे. याकाळात दररोज रामविजय ग्रंथाचे पारायण ह.भ.प राऊत महाराज करणार आहेत.

गुरुवार दि. ३० मार्च रोजी येथील श्रीराम मंदिरात प्रभु श्रीराम जन्म उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सकाळी ८ वा. प्रभुराम पादुका पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. यानतंर भजनाचा कार्यक्रम व दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. दुपारी २ ते ५ या कालावधीत भव्य बैलगाडा शर्यतीसह सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता झी टॉकीज फेम बालकिर्तनकार ह.भ.प माऊली महाराज जाहुरकर यांचे समाजप्रबोधनपर किर्तन व त्यानतंर उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे ग्रांमस्थाकडून वाटप केले जाणार आहे.दरम्यान दि. ३० व ३१ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत अर्पण ब्लड बँकेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव काळात आश्वी बुद्रुक येथील नागरीकासह पंचक्रोशीतील भाविक भक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक व ग्रांमस्थानी केले आहे.

