मविआ सरकार काळातच पाणीपुरवठा योजनांसाठी 782 कोटींचा निधी- आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर : झुंजार न्यूज
झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे हे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे ,सुधाकर जोशी, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे ,संतोष हासे, सौ अर्चनाताई बालोडे, संतोष मांडेकर, विलास कवडे, एमआयडीसीचे चेअरमन भाऊसाहेब एरंडे, किरण नवले, सरपंच सौ.प्रगती बोराडे, रमेश गुंजाळ , शंकर राहणे ,सुभाष गडाख, विजय राहणे, माधवराव वाळे, दिनकर एरंडे आदी उपस्थित होते…
प्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणीपुरवठा योजने करता 59 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. याचबरोबर निमगाव जाळी ,कोल्हेवाडी, तळेगाव ,निमोण ,निमगाव , घुलेवाडी या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा मोठा निधी मिळवला. यातून या परिसरातील गावांच्या पुढील 25 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे.
महाविकास आघाडी सरकार मधून सातत्याने निधी मिळवला .विकास कामे केली. हा निधी मागील सरकारच्या काळातील आहे. सध्याचे पालकमंत्री मात्र मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत .काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते हे सर्व जनतेला माहिती आहे.
तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत मात्र या चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी काही लोक उपद्रव निर्माण करत आहेत. जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू असे सांगताना देश व राज्यपातळीवर राजकारणाची अवस्था वाईट झाली असून खा. राहुल गांधी यांनी 20 हजार कोटींच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला अद्याप पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. उलट तातडीने खासदारकी रद्द केली आहे .
राज्यातील सरकार कोर्टाच्या निर्णयानंतर एका मिनिटात पायउतार होईल. धार्मिक तेढ निर्माण करून केले जाणारे राजकारण हे पुरोगामी व मानवतेचा विचार असलेल्या महाराष्ट्राला मान्य नसल्याचे ही त्यांनी सांगितले.
तर मिलिंद कानवडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून पाणीपुरवठा योजनांसाठीच्या सर्व मंजूरी या 11 मे 2022 रोजी मिळाली आहे. आणि सध्याचे सरकार ही 30 जून 2022 रोजी सत्तेवर आले आहे. या निधी मंजुरी मध्ये खोके सरकारचा काहीही संबंध नाही. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या कामांचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करत फिरत आहे. खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत आहे.
संगमनेर तालुक्याला संस्कृत राजकारणाची परंपरा आहे येथील विकास कामात अडथळे आणणाऱ्यांचा बंदोबस्त करू असेही ते म्हणाले..
याप्रसंगी बाळासाहेब एरंडे, गिरीश एरंडे ,भाऊराव खर्डे, सोमनाथ वाळे, कैलास पानसरे, तानाजी आहेर ,सुभाष पा गुंजाळ, डॉ प्रमोद पावशे, गणेश बोराडे यांसह गणेशवाडी, झोळे , चंदनापुरी, आनंदवाडी ,हिवरगाव पावसा या गावांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब एरंडे यांनी केले तर किरण नवले यांनी आभार मानले.
चौकट
खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल
संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्यावर खोट्या-नाट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणाऱ्या या खबऱ्यांचा बंदोबस्त जनताच करेल असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे
