*पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान*

*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत नेतृत्वाखाली महसूल मंत्र्यांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन आणि केली महाआरती*

अयोध्या : झुंजार न्यूज

 

 रामल्लाचे दर्शन आणि ऐतिहासिक अशा राम मंदीराच्या उभारणीचे काम पाहून कृतकृत्य झालो असल्याची प्रतिक्रिया महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अयोध्येतून व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोध्येत जावून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले आणि महाआरतीत देखील सहभाग घेतला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निमंत्रणानंतर विखे पाटील काल अयोध्येकडे रवाना झाले होते. आज त्यांनी अयोध्येत राम मंदीराच्या सुरू असलेल्या काम पाहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत केली. मंदीर निर्माणातील कारागीर,स्थानिक नागरीक तसेच सुरक्षा रक्षकांशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधून या सर्व कामातील बारकावे जाणून घेतले.

यासर्व पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की आयोध्येत सर्वाच्या सोबतीने झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आणि अनेक वर्षाची प्रतिक्षा असलेले राम मंदीर उभे राहात असल्याची पाहणी करत आली, यामुळे आपण कृतकृत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येत राम मंदीर व्हावे ही कोट्यावधी रामभक्तांची इच्छा होती. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंदीर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की मंदीराचे काम अतिशय आखीव रेखीव पध्दतीने होत आहे प्रत्येक खांबावरील नक्षीकाम अतिशय सुबक आणि लक्ष वेधून घेणारे असल्याने प्रभू श्रीरामाचे मंदीर हे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतिक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

******
*जनसंपर्क कक्ष*
(महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री महोदय यांचे कार्यालय)

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed