राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 38 जागा तर विधानसभेच्या निवडणुकीत 180 जागा मिळतील असे थोरात म्हणाले. ते धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील विधानसभेला महाविकास आघाडी 200 पेक्षा जास्त जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. 2024 निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम केलं तर विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा मिळतील.

तर लोकसभेच्या किमाना 40 तरी जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरातांनी देखील विधानसभा निवडणुकीत 180 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे
