संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील पानोडी ग्रामस्थाचे ग्रामदैवत श्री शंकराचार्य महादेवाचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहत संप्रन्न झाली .ग्रामस्थांसह परिसरातील लोकांची मोठी गर्दी दिसली .

पानोडी येथिल ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच जागृत देवस्थान म्हणून श्री शंकराचार्य महादेवाच्या अनेक अख्यायीका आश्वी पंचक्रोशीसह तालुक्यात प्रसिध्द आहेत. मंगळवार दि २५ एप्रिल रोजी पहाटे श्री शंकराचार्य महादेवाचे विधिवत पुजन व अभिषेक केला गेला . सायंकाळी श्री शंकराचार्य महादेवाच्या कवाडची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती . तर सायंकाळी अंजलीराजे नाशिककर याच्या लोकनाट्य तमाशा झाला . महीलासह तरुणांनी व लोकांनी यांचा आनंद घेतला . तर बुधवार दि .२६ एप्रिल रोजी संकाळी हजऱ्या , दुपारी कुस्त्याचा कार्यक्रम घेण्यात आला राहुरी , कोपरगांव , श्रीरामपूर , अकोले , नेवासा , राहाता येथून मोठ्या प्रमाणात पहिलवान आले होते . पहिलवानांनी आपली कला दाखत ग्रामस्थांना खूष केले .तर यात्रा कमिटीनी भरभरुन बक्षिसे वाटली .

दरम्यान यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येवून ग्रामस्थाकडून यात्रेची जोरदार तयारी केल्याचे चित्र दिसले . कोरोना संकटामुळे मागील दोन – तीन वर्ष यात्रा उत्सव खंड पडला होता . यावर्षीच्या यात्रांउत्सवानिमित्त ग्रामस्थांमध्ये मोठा उत्सव दिसून आला . लहान – लहान मुलांचे हट्ट पुरविण्यात पालक दिसून आले .

यात्रा यशस्वी करण्यासाठी माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे पाटील , अशोकराव तळेकर , रावसाहेब घुगे , रामनाथ पवार , माजी पोलिस आधिकारी , भाऊसाहेब चव्हाण , संरपच गणपत हजारे , ग्रा प सदस्य संजय जाधव , साहेबराव कदम , बाळासाहेब कदम , राजेंद्र जाधव , भारत शेवाळे , नय्युम सय्यद , रंगन्नाथ मुंढे , नाना कदम , हौशाभाऊ जाधव , जीवन कदम आदीसह ग्रामस्थांनी परिक्षम घेतले .

Post Views: 162
