भुवनेश्वर येथे बुध्दपौर्णीमेनिमीत्त केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंच्या उपस्थितीत शांती स्तुपाची पायाभरणी झाली   

भुवनेश्वर : झुंजार न्यूज

रशिया आणि युक्रेन मध्ये होत असलेल्या युध्दाचे दोन्ही देशांना दुष्परिणाम भोगावे लागतील. जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची गरज आहे. अहिंसा, समता, शांती या तत्वांवर आधारलेल्या भगवान बुध्दांच्या मानवतावादी बौध्द धम्माची जगाला गरज आहे. बौध्द धम्मानेच भारताचे आणि संपूर्ण जगाचे कल्याण होणार आहे या विचारानेच महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्द धम्माची दीक्षा दिली  याचा आम्हाला अभिमान आहे. भारत बौध्दमय करण्याचे  डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सर्व भारतवासीयांना बुध्दपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.  

भुवनेश्वर येथे महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने बुध्द पोर्णिमे निमीत्त  दि. 5 मे रोजी बौध्द शांती स्तुपाचा पायाभरणी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळयात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *