निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाचे श्रेय फक्त आ. थोरात यांनाच- मा.आ. डॉ. तांबे
कोरोना काळातही आ. थोरातांकडूनच सातत्याने पाठपुरावा केला
संगमनेर : झुंजार न्यूज
निळवंडे धरणाच्या कालव्यांची पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याबाबत बोलताना बोलताना मा. आ डॉ. तांबे म्हणाले की, तळेगाव सह दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणासाठी आग्रह कायम ठेवला. ९५ ते ९९ या काळात भाजपाचे सरकार होते त्यांनी त्यावेळी सुद्धा धरणासाठी कोणतेही काम केले नाही .मात्र अनेक अडथळ्यांना नंतर आ. बाळासाहेब थोरात यांनी १९९९ मध्ये प्रथम राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आ थोरात यांनी राबविला. अनेक अडथळे पार करून हे धरण २०१२ ला पूर्ण केले.या कामी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही सहकार्य लाभले. याच काळात कौठेकमळेश्वर ,पिंपळगाव कोिंझरा, गणेश वाडी या मोठ-मोठ्या बोगद्यांच्या कामांसह कालव्यांची कामे ही प्रगतीपथावर ठेवली.
मात्र २०१४ ते १९ या काळात भाजपा सत्तेवर आले या काळातील थांबलेले काम सर्व जनतेला माहिती आहे. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.फक्त प्रसिद्धीसाठी बातम्या पेरल्या गेल्या.
मात्र वस्तुस्थितीत याही काळात कालव्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आ. थोरात यांनी वेळोवेळी आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
कालव्यांची कामे पूर्ण थांबलेली असताना २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले यामध्ये बाळासाहेब थोरात यांना महसूल मंत्री पदासह सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळाली. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कालव्यांच्या कामाला पुन्हा गती दिली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून मोठा निधी मंजूर करून घेतला. सातत्याने कामाचा पाठपुरावा केला. २०२० मध्ये कोरोणाचे संकट आले. तरी अशा काळातही ही कोणतीही प्रसिद्धी न करता अकोले तालुक्यातील ० ते २८ चे कामे जलद गतीने मार्गी लागावे. या कामाची वेळोवेळी पाहणी केली.याच काळात विविध नद्यांवरील पुलांची कामे, स्ट्रक्चरल कामे सुरु ठेवली. ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागाला पाणी द्यायचे हे उद्दिष्ट ठेवून काम केले. मात्र सरकार बदलले आणि पुन्हा एकदा कामांची गती मंदावली. तरीही कालव्यातून पाणी सोडण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला.
सध्या भंडारदरा व निळवंडे धरण मिळून दहा टीएमसी पाणी असल्याने या कालव्यांमधून चाचणी घेणे शक्य आहे हे आमदार थोरात यांनी पत्राद्वारे सरकारचे लक्ष वेधले.
सतत निळवंडे धरण व कालव्यांचा ध्यास घेऊन दुष्काळग्रस्तांच्या शेतात पाणी देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच कालव्यांची चाचणी होणार असून या कामाचे पूर्ण श्रेय हे आमदार थोरात यांनाच असल्याचेही आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.
चौकट
कालव्यांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी 100 फुट उंचीवरून पाहणी
म्हाळादेवी येथील ॲक्वाडक्ट (जलसेतूची,) पाहणी कोरोना संकटकाळात आमदार बाळासाहेब थोरात यांनी क्रेनद्वारे शंभर फूट उंचीवर जाऊन केली. या कामातील अत्यंत बारकावे शोधून तातडीने काम पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला सूचना दिल्या. याचबरोबर भिंतीलागाचा ऐतिहासिक बोगदाही आमदार थोरात यांनी ब्लास्ट द्वारे खुला केला होता.
