संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी शिखर धवन फाऊंडेशन ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आपल्या घरासमोर वृक्षारोपण करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.

गेली ६ वर्षापासून बालपण स्कूल चे विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठी झटत आहे व परिसरातील नागरिकांना आवाहन करत आहे. उन्हाचा पारा 42 शी पार करत आहे. प्रचंड उष्णता यासाठी सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले पाहिजे हे आवाहन बालपण स्कूल पानोडी च्या विद्यार्थ्यांनी परिसरातील प्रत्येक नागरिकांना केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेने जून्या वह्यांचा पुनर्वापर करून वह्यांच्या एक बाजू मोकळ्या पानावर सुट्टीतील होमवर्क पुर्ण करून पर्यावरण रक्षणाचे महत्वपुर्ण काम केले आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच बालवयापासूनच पर्यावरण रक्षणाचे धडे गिरवत आहे व सोबत पालक, शेजारील, गावातील नागरिकांना पर्यावरण रक्षणाचे आवाहन करत आहे. यासाठी बालपण स्कूल पानोडी च्या प्रमुख सौ सोनाली मुंढे व सर्व शिक्षक वर्ग पर्यावरण रक्षणासाठी झटत आहे.
