संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुका हा चळवळीचा बाल्लेकिल्ला समजला जात असून येथील कार्यकर्त्या हा प्रामाणिक व ध्येयाने काम करणारा असल्याने राष्ट्रीय समाज पक्ष हा निश्चितचं तळागाळापर्यत पोहचून येणार्या निवडणुकीकरिता सज्ज राहील असा विश्वास राष्ट्रीय मुख्य महासचिव सुशिल कुमार यांनी व्यक्त केला

संगमनेर येथील शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
यावेळी संगमनेरच्या इतिहासाला उजाळा देत पक्षाच्या ध्येय धोरणाबद्दल सुशिलकुमार यांनी माहिती देत नगर पालिका , जिल्हा परिषद , पचायत समितीच्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांच्या मनात नवी उमेद निर्माण केली

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सय्यद बाबा शेख , जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे , महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड , जिल्हा सचिव नामदेव काशीद युवक जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ खेमनर, संगमनेर तालुकाध्यक्ष सोपानराव तांबडे , आण्णा शेरमाळे , गणेश खेमनर , प्रकाश गायकवाड , नवनाथ वावरे , एकनाथ बिडगर , शिव तांडव प्रतिष्ठान उपाध्यक्ष शुभम घुले , तिलक गांधी , मयुर कांडेकर , अभी रोहम , दत्तू जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सोपानराव तांबडे यांनी कार्यकारिणी जाहीर केली तर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी संगमनेर तालुक्यात झालेली आंदोलने व पूर्ण केलेली कामे या बद्दल माहिती दिली.

राष्ट्रीय समाज पक्ष संगमनेर नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये महिला तालुकाध्यक्ष तैय्यबा जावेद सय्यद तर शहराध्यक्षपदी पार्वताबाई चुडामन भोई यांची नियुक्ती करण्यात आली. संगमनेर युवक तालुकाध्यक्ष पंकज विकास खेमनर तर तालुका सचिव पदी सुनील रावसाहेब खेमनर व विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष_ अभय ठकाजी राजनोर आणि संगमनेर तालुका संपर्कप्रमुख पदी बाळासाहेब वावरे यांची नियुक्ती करण्यात आली. शंकर कारभारी खेमनर सोशल_ मीडिया तालुकाप्रमुख तर सोहेल देशमुख यांची अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद बाबा शेख यांनी मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
