संगमनेर | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठीची अतिंम प्रभाग रचनाकरिता विशेष ग्रामसभा बोलाविण्यात येवून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यावेळी चार प्रभागातून ११ उमेदवार नशिब आजमावणार असून आरक्षण बदलल्याने निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून असलेल्या अनेकाचा हिमोड झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाले असून आता उमेदवारी शोध मोहीम सुरु होणार !.
याबाबत माहिती अशी की, जागतिक कोविड-१९ चे संकट उध्दभवल्याने सर्व निवडणूकाना सरकारने स्थगित ठेवत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली होती. त्यानंतर वर्षापासून जनजीवन पुर्वपदावर येऊ लागल्याने रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका टप्प्यात – टप्प्याने घेण्यास आल्या . त्यानुसार आश्वी खुर्द ग्रामपंचायतीची मुदत संपून १ वर्ष उलटल्याने गावाला निवडणूकीची वेध लागले आहे. तर प्रशासकीय स्तरावर याबाबत हालचाली सुरु झाल्या असून ग्रायपंचायत निवडणूकीसाठी आवश्यक असलेल्या अतिम प्रभाग रचनेची प्रक्रिया विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडली .

यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती पवार, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, कामगार तलाठी भालचिन यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होती. आश्वी खुर्द गावची लोकसंख्या ४ हजार ३२२ असून निवडणूकीसाठी येथे चार प्रभाग करण्यात आले आहेत. घड्याळाच्या काट्याप्रमाणे दर पाच वर्षाला बदलत जाणारे ११ जागांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली .
प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या २ जागापैकी १ जागा अनुसूचित जाती प्रवर्ग महिलेसाठी तर दुसरी जागा ही नागरीकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आली. प्रभाग क्रमांक २ मध्ये असलेल्या ३ जागापैकी १ जागा अनुसूचित जाती प्रवर्ग व्यक्तीसाठी, दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्तीसाठी तर तिसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या ३ जागापैकी १ जागा सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीसाठी तर दोन जागा या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये असलेल्या ३ जागापैकी १ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या व्यक्तींसाठी, दुसरी जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर तिसरी जागा ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आली आहे.
यावेळी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, माजी उपसरपंच सुनील मांढरे, युनुसभाई सय्यद , विशाल शिरतार , अनिल शिंदे , विजय गायकवाड, सुयोग सोनवणे, दिपक सोनवणे, अमोल मुन्तोडे, प्रदीप वाल्हेकर, संतोष भडकवाड, सोपान सोनवणे, विकास गायकवाड, बाबासाहेब भोसले, अक्षय बर्डे, रविंद्र बर्डे, मोहित गायकवाड, पुरुषोत्तम भवर, दत्ता गायकवाड, माणिक भवर, संपतराव भोकरे, रमेश पवार, फकिरा मोरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापुर्वी काढण्यात आलेल्या ‘ लोकनियुक्त सरपंचपद सोडतीत सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित झाले. तर नुकत्याचं झालेल्या प्रभाग रचनेनुसार सदस्य पदाच्या ११ जागापैकी ६ जागा सुध्दा महिलां उमेदवारासाठी आरक्षित झाल्यामुळे आता ग्रामपंचायतीत ‘ महिला राज ‘ दिसणार असल्याने ना. विखे पाटील व आ. थोरात गटाचे कार्यकर्तेमध्ये उमेदवार शोध मोहीमेस सुरुवात झाली .
